FILM Marathi

गदर २, द कश्मिर फाइल्स हिट होणं म्हणजे भावी पिढीचं नुकसान, नसीरुद्दीन शाह यांच वक्तव्य चर्चेत (Naseeruddin Shah Calls Gadar 2, The Kerala Story Success Disturbing)

‘गदर 2’ ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटाच्या यशाने संपूर्ण बॉलिवूड खूश असून हा आनंद साजरा करत असतानाच, बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह मात्र या चित्रपटाच्या यशाने नाराज असल्याचे दिसून येत आहे. केवळ गदरच नाही तर ते द केरला स्टोरी आणि काश्मीर फाईल्सवरही नाराज असल्याचे दिसत असून त्यांनी या चित्रपटांविरोधात भाष्य केले आहे.

आपल्या बेताल वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे नसीरुद्दीन शाह अनेक दिवसांपासून बॉलिवूड आणि चित्रपटांच्या ट्रेंडविरोधात बोलत आहेत. यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. ट्रोलर्सनी त्यांना अनेकदा फटकारलेही आहे. असे असूनही नसीरुद्दीन उघडपणे बोलतात. आता नसीरुद्दीन यांनी ‘गदर 2’ च्या यशावर प्रतिक्रिया दिली आहे आणि या चित्रपटाला धोकादायक ट्रेंड म्हटले आहे.

अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान नसीर यांना विचारण्यात आले की, दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करण्यासाठी 17 वर्षे का लागली, तेव्हा ते म्हणाले, “माझ्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या शेवटच्या चित्रपटाच्या धक्क्यातून मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो. जसा मी विचार केलेला तसा तो बनला नाही.

नसीर यांनी बॉलिवूडमधील चित्रपट निर्मितीच्या ट्रेंडबद्दलही सांगितले. ते म्हणाले, “आज तुम्ही जितके आंधळे देशभक्त आहात, तितके लोकप्रिय व्हाल. सध्या देशात हेच चालले आहे. आता देशावर प्रेम करणे पुरेसे नाही, देशभक्तीचा ढोल बडवणेही गरजेचे झाले आहे त्यानंतर काल्पनिक शत्रू निर्माण करायला हवा. हे लोक “ते जे करत आहेत ते किती हानिकारक आहे हे त्यांना कळत नाही.”

नसीर यांनी ‘द केरला स्टोरी’ आणि ‘गदर-2’साठीही नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “मी ‘द केरला स्टोरी’ आणि ‘गदर 2’ हे दोन्ही चित्रपट पाहिले नसले तरी हे चित्रपट कोणत्या मुद्दय़ावर आधारित आहे हे मला माहीत आहे. हे चित्रपट लोकप्रिय होणं हे खूप त्रासदायक आहे. हे योग्य नाही. सत्य मांडणारे सुधीर मिश्रा, हंसल मेहता आणि अनुभव सिन्हा या दिग्दर्शकांचे चित्रपट पाहिले जात नाहीत. चांगली गोष्ट म्हणजे हे चित्रपट निर्माते हिंमत गमावत नाहीत आणि सातत्याने चांगल्या कथा सांगण्याचा प्रयत्न करत असतात.

नसीर पुढे म्हणाले, “येत्या पिढीला हे लोक जबाबदार असतील, जेव्हा लोक भिड पाहतील आणि गदर 2 देखील पाहतील. आणि मग त्यांना समजेल की कोणता चित्रपट सत्य दाखवतो. जे घडत आहे ते भयंकर आहे. चित्रपट निर्मात्यांना यात सामील केले जात आहे. चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणारे चित्रपट बनवणे हे धोकादायक आहे.”

नासीर १७  वर्षांनंतर दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करत आहेत. ते ‘मॅन वुमन मॅन वुमन’ या लघुपटाचे दिग्दर्शन करत आहे. याआधी 2006 मध्ये रिलीज झालेला ‘युं होता तो क्या होता’ हा चित्रपट त्यांनी शेवटचा केला होता. त्यांच्या या शॉर्ट फिल्ममध्ये नसीर यांचा मुलगा विवान आणि हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025

कहानी- वो लड़की कम हंसती है… (Short Story- Who Ladki Kam Hasti Hai…)

नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…

July 3, 2025

आपके मोबाइल की बैटरी की सबसे ज़्यादा खपत करते हैं ये ऐप्स (These Apps Drain Your Phone’s Battery the Most)

आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…

July 2, 2025
© Merisaheli