Marathi

देशातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांची नव्याने ओळख करून देणारी नवी डॉक्युसिरीज (New Docuseries To Throw Light On Famous Historical Places Of India Streaming Soon)

हिस्ट्री टीव्ही 18 च्या ‘इंडिया : मार्व्हल्स अँड मिस्ट्रीज’ या पुरस्कार विजेत्या डॉक्युसिरीजचा पुढचा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. जगप्रसिद्ध लेखक विल्सम डॅलरिंपल हे या डॉक्युसिरीजमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेली तथ्ये, रहस्ये, कहाण्या पुन्हा उजेडात आणण्याचा, मानवी मनाला पडलेल्या अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा या डॉक्युसिरीजद्वारे प्रयत्न करण्यात आला आहे. ही उत्तरे शोधण्यासाठी भारतातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या जागा, पुरातन वास्तू यांना भेटी देण्यात आल्या असून काळाच्या उदरात गाडली गेलेली उत्तरे शोधून बाहेर काढली जाणार आहेत. या प्रयत्नातून अनेक धक्कादायक बाबी उजेडात येणार आहेत.

या मालिकेतून अद्भुत आणि सुंदर भारताचे दर्शन घडते. भारत हा जगातील प्राचीन आणि वैविध्यता असलेल्या देश आहे.  भारताची शाश्वत वारसा संस्कृती, ज्ञान आणि कलात्मक परंपरा यांच्या संगमाने आकाराला आली आहे. या डॉक्युसिरीजमध्ये भारतातील मंदिरे, किल्ले, मध्ययुगीन शहरे, प्रागैतिहासिक वास्तू असे बरेच काही पाहायला मिळणार आहे.

या डॉक्युसिरीजमध्ये मेवाड घराण्याचे पराक्रमी राजे आणि त्यांनी उभारलेले किल्ले दाखवण्यात आले आहेत. या मालिकेमध्ये मध्ययुगीन काळात दख्खन प्रांतात जुलुमी राजवटीमध्ये जनतेवर करण्यात आलेले भयावह अत्याचार, नरसंहार याबाबतही सांगण्यात आले आहे. सुलतानाचे तख्त असलेल्या बिजापूरमध्ये एकेकाळी जगातील सगळ्यात मोठा घुमट उभारण्यात आला होता. प्राचीन शहरे, त्यांचे मुख्य दरवाजे हे एकेकाळी राजघराण्यांची शान होते. आज हे या शहरांतील रस्ते, दरवाजे ओस पडले असून जागतिक वारशाचा ते एक भाग झाले आहेत.  हिरे बेन्नाकल आणि नर्थियांग यांचे गूढ उलगडण्याचाही या डॉक्युसिरीजमधून प्रयत्न करण्यात आला आहे. यांचा उगम आणि त्यांच्याशी निगडीत अनेक रहस्ये ही काळ्यात उदरात गडप झाली आहेत.

सात भागांचा हा माहितीपट दर्शकांसाठी अविस्मरणीय आणि अभूतपूर्व असा ठरेल याच शंकाच नाही.  सत्यकथा, नाट्यरुपांतरण, कथेचे उत्तम सादरीकरण, मांडणी माहिती असलेल्या तथ्यांची तपासणी याद्वारे इतिहास पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025

कहानी- वो लड़की कम हंसती है… (Short Story- Who Ladki Kam Hasti Hai…)

नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…

July 3, 2025

आपके मोबाइल की बैटरी की सबसे ज़्यादा खपत करते हैं ये ऐप्स (These Apps Drain Your Phone’s Battery the Most)

आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…

July 2, 2025
© Merisaheli