FILM Marathi

‘जर्नी’ मध्ये अनोख्या लढाईची कथा : ट्रेलर प्रदर्शित (New Marathi Film ‘Journey’ Is A Tale Of Young Boy’s Offbeat Journey, Who Is Away From Home)

सचिन जीवनराव दाभाडे निर्मित, दिग्दर्शित ‘जर्नी’ चित्रपटाचा रहस्यमय ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटात शंतनु मोघे, शर्वरी जेमेनिस, शुभम मोरे, अंजली उजवणे, योगेश सोमण, ओमकार गोवर्धन, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने, माही बुटाला, निखिल राठोड यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सचिन दाभाडे यांची कथा असणाऱ्या या चित्रपटाचे लेखन रवींद्र मठाधिकारी यांनी केले आहे. तर भास्कर देवेंग्रेकर, तानाजी माने, संतोष राठोड, अनिकेत अरविंद बुटाला हे ‘जर्नी’ चे सहनिर्माते आहेत.

थरारक अशा या ट्रेलरमधून एक मुलगा बेपत्ता झाल्याचे दिसत असून त्याचे पालक त्याला शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आता हा मुलगा खरोखरच बेपत्ता झाला आहे की तो त्याच्या पालकांवर रूसून निघून गेला आहे? हा बेपत्ता मुलगा नक्की कुठे आहे, अवघड वाटेवर त्याला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार आणि हा प्रवास त्याला कुठे घेऊन जाणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना १३ ऑक्टोबरला मिळणार आहे.

दिग्दर्शक सचिन दाभाडे म्हणतात, ” ‘जर्नी’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. आयुष्याशी, नात्यांशी आणि कुटुंबाशी असलेला संघर्ष यानिमित्ताने उलगडणार आहे. ही ‘जर्नी’ प्रेक्षकांना बरंच काही देणार आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच गोष्टी मागे सुटत आहेत आणि त्याच पुन्हा परत आणण्याचा प्रयत्न ‘जर्नी’मध्ये करण्यात आला आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यासोबत हा चित्रपट आवर्जून पाहावा.’’

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

मिनिटांत लपवा चेहऱ्यातील दोष (Remove Facial Defects In Minutes)

मेकअपच्या मदतीने चेहर्‍यातील दोष लपवून मिनिटांत परफेक्ट लूक मिळवता येतो. त्यासाठी या टिप्स अजमावून पाहाच.प्रत्येक…

May 18, 2024

कहानी- गंदी औरत (Short Story- Gandi Aurat)

अनु को शायद शांतम्मा में दिलचस्पी इसलिए भी थी कि उसने आज तक अपने जीवन…

May 18, 2024

बेपत्ता सोढी परतल्यानंतर पहिला फोटो आला समोर, खूपच म्हातारा दिसतोय अभिनेता (First Photo Come Out After he come back to home)

अभिनेता गुरचरण सिंहचा घरी परतल्यानंतरचा पहिला फोटो समोर आला आहे. एएनआय वृत्तसंस्थेने शनिवारी एका पोलीस…

May 18, 2024

टायगर श्रॉफ, रणवीर सिंग, विकी कौशल सर्वात जास्त कमाई करणाऱ्या 10 अभिनेत्यांच्या यादी एकदा बघा ! (Check out the list of top 10 highest earning actors)

टायगर श्रॉफ ते रणवीर सिंग पर्यंत बॉलिवुड मध्ये सर्वात जास्त कमाई करणारे चित्रपट असलेले हे…

May 18, 2024
© Merisaheli