Marathi

कीर्तनाचा वारसा नव्या पिढीकडे पोहचविणारा नवा कार्यक्रम “वसा संस्कृतीचा – वारसा कीर्तनाचा” (New Program Based On Traditional ‘ Kirtan’ Appears On TV : An Effort To Attract Next Generation)

“ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस “…

महाराष्ट्राला लाभलेली आणि शतकांचा इतिहास असलेली आपली संत परंपरा. नवविधा भक्ती मधील दुसरी भक्ती म्हणजे कीर्तन.

महाराष्ट्र ही संतांची भूमी असे आपण अभिमानाने म्हणतो आणि या आपल्या महान संतांनी त्यांचे विचार, त्यांची संत वाणी ही विविध अभंगातून आपल्याला सांगितली. पण सामान्य माणसाला त्यातला मतितार्थ समजणे तसे कठीणच आणि तिथेच तयार झाले आपले कीर्तनकार.

कोणत्याही जाती धर्माची बंधनं न पाळता केवळ भगवत भक्ती हा ज्याचा पाया आहे, अशा वारकरी संप्रदायाची, कीर्तनाची परंपरा एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचवण्याचा मानस ‘सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीचा आहे.

‘सन मराठी’ वाहिनी आपल्या संस्कृतीचा वसा आणि कीर्तनाचा वारसा जपण्यासाठी, पुढील पिढीकडे पोहचवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत आहे आणि ते पाऊल म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत संतांचे विचार पोहचवणारा कार्यक्रम “वसा संस्कृतीचा – वारसा कीर्तनाचा”. नवीन वर्षाची सुरुवात अतिशय पारंपारिक विचारांनी होणार हे नक्की. आज ९ जानेवारी २०२४ पासून दररोज सकाळी ७:३० वाजता हा कार्यक्रम ‘सन मराठी’ वाहिनीवर सुरू झाला आहे.

कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला मिळालेला वारसा, अविरतपणे पुढे नेण्याचा प्रयत्न ‘सन मराठी’ वाहिनीने केला असून ‘ह.भ.प. भगवतीताई सातारकर’, ‘ह.भ.प. चिन्मयदादा सातारकर’, ‘ह.भ.प.कांचनताई जगताप’, ‘ह.भ.प. शिवलीलाताई पाटील’, ‘ह.भ.प. सोहम महाराज काकडे’ यांचे उल्लेखनीय योगदान लाभले आहे.

आपले कीर्तनकार म्हणजे संतांचे फॅन फॉलॉवर्सच म्हणा ना. अगदी ज्ञानोबा तुकाराम माऊलींपासून निळोबांपर्यंत संतांनी केलेले अभंग समजून घेऊन, स्वतः आचरणात आणून ते महान विचार आणि त्यामागील अर्थ लोकांनां समजावणे म्हणजे कीर्तन. कीर्तनातून समाज सुधारण्याचे मोलाचे काम घडते. काही कीर्तनकार मूळ अभंगात सध्याच्या काळानुसार थोडे फार बदल घडवून सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत त्यामागील विचार लोकांना सांगतात. ऐकणारा श्रोता ऐकता ऐकता गुंग होईल आणि संतांचे महान विचार हे आपल्या रोजच्या जीवनात आचरणात आणतील याची खात्री कीर्तनकार घेत असतात.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

अजय-अतुलच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये थिरकल्या नीता अंबानी, ‘झिंगाट’वर केला डान्स, पाहा व्हिडीओ (Nita Ambani Dance On Zingaat In Ajay Atul Live Concert In Nmacc)

मुंबईतील बीकेसी येथे उभारण्यात आलेल्या नीता अंबानी कल्चरल सेंटरला नुकताच एक वर्ष पूर्ण झाले आहे.…

April 15, 2024

जान्हवी कपूरने शेअर केले राधिका मर्चंटच्या ब्रायडल शॉवरचे फोटो, पज्जामा पार्टींत मजा करताना दिसली तरुणाई (Janhvi Kapoor Shares Photos From Radhika Merchant Bridal Shower Party)

सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेल्या जान्हवी कपूरने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना सोमवारची सकाळची ट्रीट दिली…

April 15, 2024

A Strange Connection

The loneliness does not stop.It begins with the first splash of cold water on my…

April 15, 2024

‘गुलाबी साडी’च्या भरघोस प्रतिसादानंतर संजू राठोडच्या ‘Bride नवरी तुझी’ गाण्याचीही क्रेझ ( Sanju Rathod New Song Bride Tuzi Navari Release )

सध्या सर्वत्र लगीनघाई सुरू असलेली पाहायला मिळत आहे. सर्वत्र लग्नाचे वारे वाहत असतानाच हळदी समारंभात…

April 15, 2024

कहानी- वेल डन नमिता…‌(Short Story- Well Done Namita…)

“कोई अपना हाथ-पैर दान करता है भला, फिर अपना बच्चा अपने जिगर का टुकड़ा. नमिता…

April 15, 2024
© Merisaheli