Entertainment Marathi

आलिया-प्रियंका नव्हे, संजय भन्साली यांची पहिली ‘गंगुबाई’ होती, राणी मुखर्जी (Not Alia Bhatt or Priyanka Chopra, if I Rani Mukerji was the first choice for Sanjay Leela Bhansali’s ‘Gangubai Kathiawadi’)

‘गंगूबाई काठियावाडी’ या आलिया भट्ट अभिनित चित्रपटाचा फर्स्ट लूक व टिजर प्रदर्शित झाला आहे. त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे आलिया एकदम वेगळी दिसते आहे.
टिजरची खूपच तारीफ चालू आहे.

टिजरच्या सुरुवातीस निवेदक सांगतो – कामाठीपुऱ्यामध्ये कधीच अमावस्येची रात्र नसते. कारण तिथे गंगू राहते. आलियाची एंट्री देखील एकदम झकास आहे. ती म्हणते – गंगू चांद थी और चांद रहेगी.

हा चित्रपट आलियाच्या करिअरचा मैलाचा दगड ठरेल, असं बोललं जात आहे. पण संजय लीला भन्साली यांची या भूमिकेसाठी ती पहिली पसंत नव्हती. आलियाच्या आधी प्रियंका चोप्राला ही भूमिका ऑफर करण्यात आली होती. तरीपण भन्साली यांची पहिली पसंत राणी मुखर्जी होती.


राणी मुखर्जीला घेऊन ‘गंगूबाई’ बनवणार होते.

होय. हाती आलेल्या वृत्तानुसार, भन्साली यांनी या चित्रपटाची आखणी केली होती, तेव्हा ते प्रमुख भूमिका राणी मुखर्जीला देऊ पाहत होते. पण काही कारणांनी ते जमलं नाही.

राणीनंतर प्रियंकाला ऑफर देण्यात आली.

राणीशी जमलं नाही म्हणून भन्साली यांनी प्रियंकाला या भूमिकेसाठी विचारलं. तेव्हा प्रियंका त्यांच्याच ‘बाजीराव-मस्तानी’चं शूटिंग करत होती. पण तिच्या तारखा नव्हत्या. शिवाय ती हॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी धावपळ करत होती. म्हणून भन्साली यांचं हे प्रोजेक्ट तात्पुरतं थांबलं.

‘इंशा अल्लाह’ गुंडाळला म्हणून आलियाला मिळाला…

याच दरम्यान आलिया आणि सलमान खान या जोडीचा ‘इंशा अल्लाह’ हा चित्रपट गुंडाळला गेला. भन्सालींकडे आलियाच्या डेटस्‌ होत्याच, म्हणून त्यांनी ‘गंगूबाई काठियावाडी’साठी तिला घेतलं. हा चित्रपट त्यांनी कमी वेळात बनवला आहे.

हुसैन झैदी यांच्या पुस्तकावर आधारित…

साठाव्या शतकातल्या माफिया क्विनवर हा चित्रपट आधारित आहे. एका तरुणीस बळजबरीने वेश्याव्यवसायात ढकलले जाते. ती कामाठीपुऱ्यात कोठा चालवते. हुसैन झेदा यांच्या ‘माफिया क्विन ऑफ मुंबई’ या पुस्तकावरून हा चित्रपट बेतला आहे.

कोण होती गंगूबाई?

मुंबईच्या कामाठीपुरा या वेश्यावस्तीत कोठा चालविणारी ती धैर्यवान बाई होती. मुळात ती गुजराथमधील एक भोळीभाबडी मुलगी होती. तिला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलं. नंतर हीच गंगूबाई, माफिया क्विन गंगूबाई काठियावाडी म्हणून नावारूपास आली. मुंबईचा डॉन करीम लालापर्यंत तिची ओळख होती. पुढे गंगूबाईने वेश्यांसाठी पुष्कळ काम केलं. मुंबईच्या आझाद मैदानात भाषण देताना गंगूबाई बोलली होती – कामाठीपुऱ्यात जर बायका नसतील तर मुंबईचे रस्ते बायकांसाठी असुरक्षित होतील. या चित्रपटाचा टिजर बघून लक्षात येत आहे की, आलिया भट्टने या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे.

majhisaheli

Share
Published by
majhisaheli

Recent Posts

क्या आप जानते हैं इन दिलचस्प तथ्यों को?.. (14 Unusual Facts That Surprise You)

किसी नारी के नाम पर रखा गया एकमात्र देश है सेंट लूसिया. इसे सिरैक्यूज़ के…

May 8, 2024

वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी उचलणाऱ्या १० वर्षाच्या मुलाला अर्जुन कपूरचा मदतीचा हात (Arjun Kapoor offers Educationl Help To Delhi boy Selling Roadside Food After Father’s Death)

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिल्लीच्या रस्त्याच्या कडेला अन्न विकणाऱ्या १०…

May 8, 2024

हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’ आता मराठीत अल्ट्रा झकास ओटीटीवर! (Hollywood’s Mysterious ‘Ghost’ Is Coming To Visit On Ultra Zakas OTT!)

रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता ‘भुताटकी’ या…

May 8, 2024

कहानी- तुच्छ सी अभिलाषा (Short Story- Tuchchh Si Abhilasha)

“… वो तो दीया ने बताया कि उनके ऑफिस में आनेवाला डिब्बे का खाना एक…

May 8, 2024
© Merisaheli