Marathi

गणेशोत्सवाचं औचित्य साधत, कोकणातील नयनरम्य सौंदर्य दाखवणारं ‘देवाक काळजी २’ या वेबसिरीजमधलं ‘गाव कोकण’ गाणं रिलीज ( On the occasion of Ganeshotsav, ‘Gaon Konkan’ Song released from the web series ‘Devak Kalji 2’)

अभिनेता समीर खांडेकर दिग्दर्शित ‘देवाक काळजी १’ या वेबसिरीजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाचं औचित्य साधत ‘देवाक काळजी २’ ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अनुश्री फिल्म्सचे निर्माते मयूर तातुसकर आणि आपली सोसल वाहिनी निर्मित ‘देवाक काळजी २’ या वेबसिरीजमधील ‘गाव कोकण’ हे गाणं अनुश्री फिल्म्सवर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकर, केतकी पालव, पूजा खानोलकर हे कलाकार आहेत, तर हे गाणं राजेश्वरी पवार हिच्या सुमधूर आवाजात आहे. रविराज काळे यांनी या गाण्याचं संगीत केलं असून गीतकार मंदार इंगळे आहेत.

या गाण्याविषयी दिग्दर्शक – अभिनेता समीर खांडेकर सांगतात, “अनुश्री फिल्म्स आणि ‘आपली सोसल वाहिनी’ विषयी सांगायचं झालं, तर या दोन्ही प्रोडक्शन हाऊसनी एकत्र येऊन खूपच दर्जेदार कामगिरी केली आहे. मी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. आमचा उद्देश स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांची कला प्रेक्षकांसमोर आणणं आहे.”

निर्माते मयूर तातुसकर या गाण्याच्या चित्रीकरणाविषयी सांगतात, “’गाव कोकण’ या गाण्याचं चित्रीकरण अत्यंत खास आणि अविस्मरणीय होतं. कोकणाचं नैसर्गिक सौंदर्य आणि तिथलं लोकजीवनाचं जिवंत चित्रण करण्यासाठी आम्ही विशेष मेहनत घेतली. चित्रीकरणासाठी नैसर्गिक आणि सुंदर ठिकाणं निवडली होती, ज्यामुळे कोकणाचं अप्रतिम सौंदर्य गाण्यात सजीव झालं. आपली सोसल वाहिनीच्या ‘देवाक काळजी सीझन १’ या सिरीजला मिळालेल्या प्रेरणेतून आम्ही सीझन २ मध्ये सहभागी झालो. स्थानिक लोकांनी या कलाकृतीत खूप सहकार्य केलं, ज्यांचे मनःपूर्वक आभार मानावेसे वाटतात. त्यांच्यामुळे या गाण्यातील प्रत्येक दृश्य अधिक प्रभावीपणे चित्रित करता आलं.”

पुढे ते सांगतात, “अनुश्री फिल्म्सने अजय गोगावले- पंढरीचे आई, दिव्य कुमार -भाव भक्ती विठोबा, आर्या आंबेकर-देवा गणेशा, रोहित राऊत-तु सखा श्रीहरी, मनीष राजगिरे-गजानना, पदमनाभ गायकवाड-रायगड जेजुरी, अवधूत गांधी-लढला मावळा रं, आणि राजेश्वरी पवार-गाव कोकण, भेटीची रं देवा या सारख्या गायकांसोबत विविध प्रोजेक्ट्स पूर्ण केले आहेत. चांडाळ चौकडीच्या करामतींमध्ये नक्षत्रा मेढेकर, रोहित चव्हाण या कलाकारांनी भूमिका केल्या आहेत, ज्या प्रेक्षकांना भावनिकरित्या जोडणाऱ्या आहेत. आमचा उद्देश स्थानिक संस्कृतीला जागतिक स्तरावर पोहोचवणं आहे. सध्या आम्ही सिंहगड किल्ल्याच्या इतिहासावर आधारित एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंटरी तयार करत आहोत. आमचा प्रेक्षकांपर्यंत उत्कृष्ट कलाकृती पोहोचवण्याचा ध्यास असाच पुढे चालू राहील. “

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

गोंधळेकर (Short Story: Gondhalekar)

तुम्हाला खरंच सांगतो. परतपरत सांगतो. मी गोंधळेकर आहे. मी गोंधळ घालतो आणि मी असेच गोंधळ…

November 6, 2024

इतका माज कसला, विमानतळावरच्या त्या व्हिडिओमुळे करिना कपूर ट्रोल (What Is The Reason for So Much Attitude…’ Seeing Kareena Kapoor’s Behavior With a Fan at Airport)

बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये करीना कपूर खानच्या नावाचा समावेश होतो, ज्यांनी आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक ब्लॉकबस्टर…

November 6, 2024

‘पुष्पा २’ चित्रपटामध्ये‘ही’ अभिनेत्री करणार अल्लू अर्जुनबरोबर आयटम साँग; घेतलं ‘इतकं’ मानधन (Pushpa 2 Exclusive: Not Shraddha Or Triptii Dimri, Sreeleela To Join Allu Arjun For A Dance Number)

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’च्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा: द रूल’…

November 6, 2024
© Merisaheli