Marathi

गायिका पलक मुच्छलनं हृदयविकाराचा सामना करणाऱ्या तीन हजार मुलांचे वाचवले प्राण (Palak Muchhal saves 3000 lives with fundraiser)

गायिका पलक मुच्छल हृदयविकारानं ग्रस्त असलेल्या वंचित मुलांसाठी उदात्त कार्य करत आहे. अशा मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी ती पैसे गोळा करत आहे. नुकतीच ३००० वी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर तिनं एक पोस्ट शेअर केली आहे.

गायिका पलक मुच्छल तिच्या ‘सेव्हिंग लिटिल हार्ट्स’ या फंडरेझर मोहीमेअंतर्गत हृदयविकारानं ग्रस्त असलेल्या वंचित मुलांच्या शस्त्रक्रियांसाठी पैसे गोळा करत आहे. ११ जून रोजी, पलकच्या पुढाकारातून ३००० वी शस्त्रक्रिया झाली. ही शस्त्रक्रिया इंदूरच्या आठ वर्षांच्या आलोक साहूवर करण्यात आली. मंगळवारी, ११ जून रोजी पलकनं तिच्या इंस्टाग्रामवर आलोक साहूचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, “३००० लोकांचे प्राण वाचले. आलोकसाठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद.” शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून तो आता पूर्णपणे बरा आहे.”

रिपोर्ट्सनुसार, पलक मुच्छलनं वयाच्या सातव्या वर्षी हे काम सुरू केलं होतं. एका मुलाखतीत तिनं तिच्या प्रवासाविषयी माहिती देताना म्हटलं होतं की, “जेव्हा मी हे मिशन सुरू केले, तेव्हा हा एक छोटासा उपक्रम होता. मी वयाच्या सातव्या वर्षीपासून यासाठी काम करत आहे आणि आता हे माझ्या आयुष्याचं एक मिशन बनलं आहे.” पुढं तिनं सांगितलं, “माझ्या वेटींग लिस्टमध्ये अजूनही ४१३ मुले आहेत. मी करत असलेला प्रत्येक संगीत कार्यक्रम हार्ट सर्जरीला डेडिकेट असतो. ही एक जबाबदारी असल्यासारखे वाटते आहे. देवानं मला एक माध्यम म्हणून यासाठी निवडले आहे.”

पुढं तिनं सांगितलं, “जेव्हा माझ्याकडे चित्रपटासाठी गायिका म्हणून काम नव्हते, तेव्हा मी तीन तास गायचे आणि फक्त एका मुलाच्या शस्त्रक्रियासाठी पैसे गोळा करू शकत होते. माझी गाणी जसजशी लोकप्रिय होऊ लागली तसतशी माझी फी वाढली. एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये १३-१४ शस्त्रक्रिया परवडतील इतके पैसे मी मिळवायचे. म्हणून, मी ते चालू ठेवले. समाजात बदल घडवून आणण्याचे माध्यम म्हणून मी नेहमीच माझ्या कलेकडे पाहिले आहे.” पलकनं अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. यामध्ये तिचं ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’मधील ‘कौन तुझे’ हे गाणं खूप हिट झालं होतं. याशिवाय तिनं शाहिद कपूर स्टारर ‘राजकुमार’मधील ‘धोका धाडी’ हे गाणं गाऊन खूप प्रसिद्धी मिळवली होती.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025

कहानी- वो लड़की कम हंसती है… (Short Story- Who Ladki Kam Hasti Hai…)

नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…

July 3, 2025

आपके मोबाइल की बैटरी की सबसे ज़्यादा खपत करते हैं ये ऐप्स (These Apps Drain Your Phone’s Battery the Most)

आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…

July 2, 2025
© Merisaheli