अभिनेत्री पूनम पांडेचं निधन झालं आहे. तिच्या टीमने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘पूनमचं गुरुवारी रात्री निधन झालं’, असं तिच्या टीमने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे. पूनम पांडेच्या टीमने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन निधनाची माहिती दिली आहे. ‘आजची सकाळ ही आमच्यासाठी खूप कठीण आहे. तुम्हाला कळवताना दु:ख होत आहे की मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचे सर्वायकल कन्सरने निधन झाले आहे. आजवर तिच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने तिच्यावर प्रेम केले’ या आशयाची पोस्ट तिच्या अकाऊंटवर करण्यात आली आहे.
पूनम पांडे ही प्रसिद्ध मॉडेल होती. २०११ मध्ये क्रिकेट वर्ल्ड कप फायनल मॅचच्या आधी पूनम सर्वाधिक चर्चेत आली होती. भारताने अंतिम सामना जिंकला तर मी स्ट्रिपिंग करेन, असं तिने जाहीर केलं होतं. तिच्या या व्हिडीओची त्यावेळी सर्वाधिक चर्चा झाली होती. पूनमच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ या रिॲलिटी शोमध्ये झळकली होती.
पूनमने २०१३ मध्ये ‘नशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने एका शिक्षिकेची भूमिका साकारली होती, जिचे तिच्या विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध असतात. या चित्रपटानंतरचा काळ खूप कठीण असल्याचं सांगत पूनम ‘लॉक अप’ या शोमध्ये म्हणाली होती, “त्या चित्रपटानंतर मला ज्या काही ऑफर्स येत होत्या ते मी घेऊ नये असं अनेक लोक सांगू लागले. मला अभिनय करायचं आहे, चित्रपटांमध्ये काम करायचं आहे असं मी त्यांना सांगू इच्छिते. मी उत्तम डान्सर आहे आणि अभिनेत्रीसुद्धा आहे, हे मला सिद्ध करून दाखवायचं आहे. चुकीचे निर्णय घेऊन माझी दिशाभूल झाली. पण आता मी योग्य मार्ग निवडणार आहे.”
पूनम पांडेने कानपूरमधील गृहनगर येथील घरी अखेरचा श्वास घेतला. याच ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. पूनम पांडेच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी तिच्या निधनाचे सत्य मान्य केलेले नाही तर काहींनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे. सध्या सोशल मीडियावर तिची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.
(Photo – Instagram)
बोनी कपूर (Boney Kapoor) की बेटी और अर्जुन कपूर (Arjun Kapoor) की बहन अंशुला कपूर…
कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में दयाबेन का मुख्य किरदार निभाने वाली दिशा…
रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…
देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) इन दिनों स्पिरिचुअल जर्नी पर हैं और पति शाहनवाज़ (Shanwaz Shaikh)…
नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…
'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) स्टार रोहित पुरोहित (Rohit Purohit)…