प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी नुकतेच पालक झाले आहेत. या जोडप्याने 19 ऑक्टोबर रोजी बाळाचे स्वागत केले आणि आई-वडील झाल्याचा आनंद व्यक्त केला. त्यांची मुलगी एक महिन्याची आहे, परंतु आतापर्यंत या जोडप्याने त्यांच्या मुलीची एक झलक दाखवली नव्हती, परंतु वाढदिवसाच्या दिवशी वडील प्रिन्स नरुलाने मुलीची हलकी झलकच दाखवून तिच्या नावाचाही खुलासा केला.
२४ नोव्हेंबरला प्रिन्सने त्याचा वाढदिवस साजरा केला. बाप झाल्यानंतरचा हा त्याचा पहिला वाढदिवस होता, त्यामुळे यावेळी त्याचा वाढदिवस त्याच्यासाठी खूप खास होता. त्याने हा खास दिवस त्याच्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीसोबत म्हणजेच त्याच्या मुलीसोबत साजरा केला आणि त्याची सुंदर झलकही सोशल मीडियावर शेअर केली.
प्रिन्स नरुलाने त्याच्या वाढदिवसानिमित्त आपल्या मुलीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो आपल्या राजकुमारीला छातीशी धरून खूप आनंदी दिसत आहे. फोटो शेअर करण्यासोबतच प्रिन्सने कॅप्शनमध्ये एक लांबलचक नोटही शेअर केली आहे आणि त्याने बाप झाल्यानंतरच्या भावना तर शेअर केल्या आहेतच, पण आपल्या मुलीचे नावही उघड केले आहे.
प्रिन्सने लिहिले, “दिल तू जान तू जब मैं जीना मेरे जीने दी वजा तू… हैप्पी बर्थडे मेरा बच्चू. तुला भेटण्यासाठी पापा रोडीज सोडून 30 मिनिटे भेटण्यासाठी, रस्त्याने 14 तास आणि विमानाने 3 तास प्रवास करुन आले, पण नंतर मी सर्वकाही विसरलो. ते ही फक्त तुला भेटून पप्पाची जान आहेस तू…
कॅप्शनमध्ये प्रिन्सने आपल्या मुलीचे नावही उघड केले आहे. त्याने लिहिले, “एकलीनवर पापापेक्षा जास्त प्रेम कोणीच करत नाही. मी नेहमीच तुझे रक्षण करीन आणि माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आणि माझ्या आयुष्याला आनंद दिल्याबद्दल धन्यवाद #prileen.” पोस्टमध्ये, प्रिन्सने खुलासा केला आहे की त्याने आपल्या बाळाचे नाव एकलिन ठेवले आहे, ज्याचा अर्थ एकामध्ये गढून गेलेला आहे. याशिवाय या नावाचा अर्थ बुद्धिमान, ज्ञानी, अभ्यासू, स्वतंत्र, निर्भय, अंतर्ज्ञानी असाही होतो.
चाहते आता प्रिन्सच्या पोस्टवर जोरदार कमेंट करत आहेत आणि त्याच्या मुलीच्या नावाचे कौतुक करत आहेत. मात्र, युविका चौधरी या पोस्टमधून का गायब आहे याचेही काही चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे. गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा आहे की युविका आणि प्रिन्समध्ये मतभेद आहेत आणि सध्या दोघेही एकत्र राहत नाहीत. आता प्रिन्सच्या वाढदिवसाने या चर्चेला उधाण आले आहे.
Ditch deeper lip shades such as wine and chocolate for vibrant and softer ones that…
एक ज़माना था जब लड़का हो या लड़की, कम उम्र में यानी 18-20 साल में…
प्रिंस नरूला (Prince Narula) और युविका चौधरी (Yuvika Chaudhary) हाल ही में पैरेंट्स बने हैं.…
गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. घटस्फोटाच्या अफवांच्या…
'कथा अनकही' फेम एक्ट्रेस (Katha Ankahee fame actress) अदिति देव शर्मा (Aditi Dev Sharma) के…
बीते काफी समय से अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) और ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan)…