आजकाल, प्रियांका चोप्रा तिच्या ‘द ब्लफ’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी ऑस्ट्रेलियात आहे, जिथे तिची लेक मालती मेरी देखील तिच्यासोबत आहे. प्रियंका अनेकदा मालतीसोबत चित्रपटाच्या सेटवर जाते. आता शेड्यूलमधून वेळ काढून, पती निक जोनास देखील ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. प्रियांका सध्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवत आहे, ज्याची एक झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
प्रियंका तिच्या व्यावसायिक जीवन आणि वैयक्तिक जीवनात नेहमीच समतोल राखते. शूटिंग दरम्यानही कौटुंबिक वेळ काढण्यास विसरत नाही. आता निक देखील ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे, प्रियांकाने तिची मुलगी आणि निक सोबत बीच व्हॅकेशन एन्जॉय केले. तिच्या बीच व्हेकेशनचे अनेक फोटो तिच्या फॅन पेजवर शेअर केले आहेत, ज्यावर चाहते आता प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
प्रियंका तिची मुलगी मालती मेरी आणि पती निक जोनास सोबत चांगला वेळ घालवताना दिसली. फोटोत अभिनेत्रीने काळ्या आणि पांढऱ्या रंगाची बिकिनी घातली आहे आणि ती तिची टोन्ड फिगर दाखवताना दिसत आहे. यासोबत तिने मॅचिंग कॅप आणि सन ग्लासेस देखील घातले आहेत.
निक जोनासने काळा शर्ट आणि पॅण्ट परिधान केली आहे. टोपी आणि चष्मा घालून वडिलांचे कर्तव्य बजावताना दिसत आहे. या दोघांमध्ये मालती मेरी सर्व लाइमलाइट चोरत आहे, तिने काळ्या आणि केशरी रंगाचे कपडे व पांढरी टोपी असा खूप गोंडस लूक केला आहे . ती वाळूशी खेळताना दिसत आहे.
प्रियांकाची ही कौटुंबिक छायाचित्रे इंटरनेटवर येताच लोकप्रिय झाली आहेत. चाहत्यांना त्यांचे बाँडिंग खूप आवडले आहे आणि ते या फोटोंवर भरपूर कमेंट करून आणि प्रियांकाचे कौतुक करत आहेत.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, प्रियांका चोप्रा सध्या ‘द ब्लफ’चे शूटिंग करत आहे. अलीकडेच, या अभिनेत्रीला चित्रपटाच्या सेटवर खूप दुखापत झाली होती, ज्याची एक झलक तिने तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावर दाखवली.
कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में दयाबेन का मुख्य किरदार निभाने वाली दिशा…
रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…
देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) इन दिनों स्पिरिचुअल जर्नी पर हैं और पति शाहनवाज़ (Shanwaz Shaikh)…
नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…
'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) स्टार रोहित पुरोहित (Rohit Purohit)…
आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…