Marathi

शेवटच्या फेरीत चुकीचं उत्तर देऊनही जिंकलेली प्रियांका चोप्रा, समोर आला जुना व्हिडिओ ( Priyanka Chopra Gave Wrong Answer At Miss World Last Round)

प्रियांका चोप्राचा मिस वर्ल्ड स्पर्धेतला व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्याची ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री आजकाल हॉलिवूडमध्ये खूप सक्रिय असते. अभिनेत्री २००० साली मिस वर्ल्ड हा किताब पटकावला होता.

या स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत प्रियांकाला , ‘तुम्हाला आजची सर्वात यशस्वी महिला कोण वाटते आणि का?’ असा प्रश्न विचारला गेला. यावर प्रियांकाने उत्तर दिले, पण ते चुकीचे ठरले. प्रियांकाने मदर तेरेसा यांचे नाव घेत आपले मत व्यक्त केले. पण आता त्यावेळी प्रियांकाने चुकीचे उत्तर दिल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

ती म्हणाली होती, ‘मी खूप लोकांची प्रशंसा करते, परंतु माझ्या आवडत्या लोकांपैकी एक म्हणजे मदर तेरेसा, ज्या खूप दयाळू, विचारशील आणि प्रेमळ आहेत. त्यांनी आपल्यासाठी आणि अनेक देशांसाठी खूप काही मिळवले आहे. इतरांचे जीवन सुंदर बनवण्यासाठी त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला.

प्रियांकाच्या या उत्तराला त्यावेळी प्रेक्षकांच्या भरपूर टाळ्या मिळाल्या पण २००० मध्ये मदर तेरेसा हयात नसल्याने ते उत्तर चुकीचे ठरले. मदर तेरेसा यांचे १९९७ मध्ये निधन झाले होते आणि प्रियांकाने उत्तर देताना त्या हयात असल्याप्रमाणे दिलेले.

२०२२ मध्ये प्रियंका चोप्राची प्रतिस्पर्धी लीलानी मॅककॉन्की हिने प्रियांकाच्या विजयाचा निकाल खूप घाईघाईत घेतलेला असा दावा केला.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

पैरेंट्स के आपसी रिश्ते तय करते हैं बच्चे का भविष्य (Relationship Between Parents Decides The Future Of The Child)

गर्भावस्था में मां की सेहत व मनःस्थिति का प्रभाव तो शिशु पर पड़ता ही है,…

May 18, 2024

सारा अली खान की हुई सगाई, बिजनेसमैन संग जल्दी ही रचाएंगी शादी, खबर पक्की है (Sara Ali Khan is engaged; will tie the knot this year: Reports)

पटौदी खानदान की लाडली और सैफ अली खान- अमृता सिंह की बेटी सारा अली खान…

May 18, 2024

पारू आणि आदित्यचं लग्न झालं? …; ‘पारू’ मालिकेचा नवा जबरदस्त प्रोमो (Paru And Aditya Wedding Paaru Serial New Promo Viral)

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिकेची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. १२ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या…

May 18, 2024

इम्रान आणि लेखाच्या डेटिंगच्या चर्चांना पूर्णविराम (Imran Khan Girlfriend Lekha Washington Shared first Romantic Photo)

इम्रानने त्याच्या आणि लेखाच्या डेटिंगबद्दल सांगितल्यानंतर सोशल मीडियावर या कपलची ही पहिलीच अधिकृत पोस्ट आहे.…

May 18, 2024

मिनिटांत लपवा चेहऱ्यातील दोष (Remove Facial Defects In Minutes)

मेकअपच्या मदतीने चेहर्‍यातील दोष लपवून मिनिटांत परफेक्ट लूक मिळवता येतो. त्यासाठी या टिप्स अजमावून पाहाच.प्रत्येक…

May 18, 2024
© Merisaheli