Marathi

‘ताठ मानेने जगायला शिका’ – अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई डॉ. मधू चोप्रा यांनी पटवून दिले पालकत्त्वाचे महत्त्व (Priyanka Chopra’s Mother Dr. Madhu Chopra Express Her Views On Prudent Guardianship)

पालकत्वाचे महत्त्व समजावून सांगणारे व्यक्तिमत्व म्हणून डॉ. मधू चोप्रा यांची ओळख आहे. प्रियांका चोप्रा आणि सिद्धार्थ चोप्रा यांची आई डॉ.मधू चोप्रा यांनी सुजाण पालकत्वाचे महत्त्व समजावून सांगताना म्हटले आहे की, मुलांना यशस्वी, अंगी आत्मविश्वास आणि इतरांप्रती आदरभाव असलेली व्यक्ती म्हणून घडवण्यात पालकत्वाचा महत्त्वाचा वाटा असतो. ‘पेरेंटीग मेड इझी’ या कोटो समूहावर डॉ.मधू चोप्रा यांनी पालकत्वाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी समजावून सांगितल्या आहेत.  कोटो हा एक सामाजिक समूह मंच असून हा मंच फक्त महिलांसाठीचा मंच आहे. आपली दोन्ही मुले ही नम्र असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या आजी आजोबांचे त्यांच्यावर असलेले संस्कार हे आहे, असे डॉ. चोप्रा यांनी म्हटले.

डॉ. चोप्रा यांनी त्यांच्या जडणघडणीबाबत बोलताना म्हटले की, आमच्या घरात शिस्तीचं वातावरण होतं मात्र शिक्षणाला खूप महत्त्व होतं. हे सांगत असतानाच त्यांनी म्हटले की, पालकांनी त्यांच्या मुलांचे संगोपन करत असताना हुशार भूमिका अंगीकारणं गरजेचं आहे.  आपल्या बालपणातील जडणघडणीतून जे पालक त्यातील कोणत्या गोष्टी निवडाव्यात हे जाणतात ते पालक हुशार पालक असतात, असे डॉ.चोप्रा यांचे म्हणणे आहे. ही क्षमता ज्या पालकांमध्ये असते ते पालक त्यांच्या जडणघडणीमध्ये मिळालेली कोणती मूल्ये आपल्या मुलांना द्यायची आहेत, याबाबत सुजाणपणे विचार करत असतात. मी या हुशार पालकांपैकी एक आहे असं मला वाटते असे डॉ.चोप्रा यांनी म्हटले आहे.

नव्या गोष्टी आत्मसात करणे, चुका झाल्यास त्या का झाल्या? त्या होऊ नये यासाठी काय करावे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पराभवाच्या भीतीने खचून जाऊ नये हे माझ्या वडिलांनी शिकवलं होतं. त्यांनी मला ज्ञान प्राप्त करू दिलं आणि चुकांमधून शिकण्याची मोकळीकही दिली. डॉ. मधू चोप्रा यांनी म्हटले आहे की, “मी माझ्या दोन्ही मुलांना सांगितले आहे की तुम्ही माझ्या खांद्यावर उभे आहात याची जाणीव ठेवा आणि ताठ मानेने जगायला शिका. जर तुम्ही पडलात तर हे ध्यानात ठेवा की तुम्हाला सावरण्यासाठी मी खाली उभी आहे. पडण्याच्या भीतीने घाबरून जाऊ नका.”

डॉ. मधू चोप्रा या त्यांचे अनुभव आणि सल्ले, कोटोवर अन्य पालकांसाठी शेअर करत असतात. हे महिलांसाठी आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करण्यासाठीचे एक सुरक्षित ठिकाण.  इथे महिला कोणताही आडपडदा न ठेवता आपल्या समस्या, मनातल्या भावना मांडू शकतात किंवा सल्लाही देऊ शकतात.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025

कहानी- वो लड़की कम हंसती है… (Short Story- Who Ladki Kam Hasti Hai…)

नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…

July 3, 2025

आपके मोबाइल की बैटरी की सबसे ज़्यादा खपत करते हैं ये ऐप्स (These Apps Drain Your Phone’s Battery the Most)

आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…

July 2, 2025
© Merisaheli