Entertainment Marathi

कॉलेजमधल्या रॅगिंगने बदलले चित्रांगदाचे आयुष्य, त्यामुळेच झाली सिनेइंडस्ट्रीत एण्ट्री (Ragging in college changed Chitrangada Singh’s Life)

जेव्हा बॉलिवूडच्या सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रीमध्ये चित्रांगदा सिंहचा ही समावेश होतो. 30 ऑगस्ट 1976 रोजी जोधपूर, राजस्थान येथे जन्मलेली चित्रांगदा इंडस्ट्रीतील एक उत्तम अभिनेत्री आहे, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तिने कधीही अभिनेत्री बनण्याचा विचार केला नव्हता, परंतु कॉलेजमधील रॅगिंगने तिचे आयुष्य बदलले आणि ती बॉलिवूडमध्ये आली. चला जाणून घेऊया चित्रांगदा सिंगशी संबंधित ही रंजक गोष्ट…

एका मुलाखतीत चित्रांगदा सिंगने ती ग्लॅमर इंडस्ट्रीत कशी आली याबद्दल एक मनोरंजक खुलासा केला होता. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, हा तो काळ होता जेव्हा ती दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेजमधून होम सायन्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण करत होती. त्यादरम्यान तिच्यावर कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात रॅगिंग झाली.

रॅगिंग दरम्यान, अभिनेत्रीला तिचा सलवार कमीज उलटा घालण्यास सांगितले होते. यासोबतच तिला केसांना तेल लावायला आणि पुस्तके बादलीत ठेवण्यास सांगितली. इतकंच नाही तर रॅगिंग करताना तिला रॅम्पवर चालायलाही लावलं होतं. चित्रांगदा म्हणाली की, कॉलेजमध्ये तिला रॅग केले जात होते तरी ही तिची पहिली मॉडेलिंग ऑडिशन होती, कारण त्या घटनेनंतर ती तिच्या कॉलेजच्या फॅशन टीममध्ये सहभागी झाली.

रॅगिंगनंतर चित्रांगदाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला आणि इथून तिने ग्लॅमर इंडस्ट्रीत येण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर तिने व्हिडिओ अल्बममधून करिअरला सुरुवात केली. तिला पहिला ब्रेक गुलजार यांच्या ‘सनसेट पॉइंट’ या व्हिडिओ अल्बममध्ये मिळाला. यानंतर अभिनेत्री ‘कोई लौटा दे वो प्यारे-प्यारे दिन’ या व्हिडिओ अल्बममध्ये दिसली.

त्यादरम्यान चित्रपट निर्माता सुधीर मिश्रा यांनी त्यांची दखल घेतली आणि तिला ‘हज़ारों ख्वाइशें ऐसी’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटातील आपल्या दमदार अभिनयाने चित्रांगदाने सर्वांची मने जिंकली. त्यानंतर चित्रांगदाने ‘देसी बॉईज’, ‘इंकार’ आणि ‘ये साली जिंदगी’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि तिच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत एक वेगळे स्थान निर्माण केले.

चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच चित्रांगदाने निर्मिती आणि जजिंगमध्येही आपले कौशल्य दाखवले आहे. अभिनेत्री टीव्ही शो ‘डीआयडी लिटिल मास्टर्स 4’ मध्ये जजच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय ती अॅमेझॉन प्राइमच्या ‘मॉडर्न लव्ह मुंबई’ या वेब सीरिजमध्ये दिसली आहे. तिने प्रॉडक्शनमध्येही नशीब आजमावले आहे.

तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच चित्रांगदा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत आली आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, अभिनेत्रीने 2001 मध्ये भारतीय गोल्फर ज्योती रंधावाशी लग्न केले आणि त्यांना एक मुलगा देखील आहे. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि 2014 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम)

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कविता- रसिक प्रेम (Poetry- Rasik Prem)

रसिक श्यामलेकर अधरों पर मुस्कानछेड़ वंशिका की तानपुकार रहे राधा नाम राधामन ही मन रिझायेरसिक…

May 20, 2024

कहानी- आख़री ख़त (Short Story- Aakhri Khat)

औरत को ये क़ैद क्यों मिलती है? शायद तुम्हारे मौन का कारण तुम्हारी अपनी क़ैद…

May 20, 2024

Turn Down The Heat

Parenting is hard work. Sometimes, our kids make us feel angry. We will come home…

May 20, 2024

यामी गौतम झाली आई! अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन (Yami Gautam And Director Aditya Dhar Blessed With Baby Boy)

बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं आहे. १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या…

May 20, 2024
© Merisaheli