FILM Marathi

पहिल्यांदाच राणी मुखर्जीने केला आपल्या गर्भपाताचा खुलासा, गरोदरपणाच्या ५ महिन्यात गमवंल दुसरं बाळ (Rani Mukerji Opens Up For The First Time About Miscarriage, She Lost Her Second Baby Five Months Into The Pregnancy)

चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आदित्य चोप्रासोबत लग्न केल्यानंतर स्थिरावलेली बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीने नुकताच तिच्या दुसऱ्या गरोदरपणाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. या खुलाशात अभिनेत्रीने सांगितले की, कोविड 19 महामारीमध्ये ती दुसऱ्यांदा गरोदर राहिली होती, परंतु दुर्दैवाने गरोदरपणाच्या 5व्या महिन्यात तिने तिचे दुसरे बाळ गमावले.

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, राणी मुखर्जी इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी मेलबर्नला गेली होती. यादरम्यान राणी मुखर्जीने तिच्यासोबत घडलेल्या वैयक्तिक दुःखाचा खुलासा केला. अभिनेत्रीच्या या वैयक्तिक शोकांतिकेचा खुलासा ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

अभिनेत्रीने सांगितले की, ती कोविडच्या काळात दुसऱ्यांदा गरोदर राहिली. पण दुर्दैवाने गरोदरपणाच्या 5व्या महिन्यात तिने तिचे दुसरे बाळ गमावले. राणीने तिच्या चाहत्यांना सांगितले की तिच्या मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिच्यासोबत ही घटना घडली होती. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मी याबद्दल काही बोलले असते तर प्रत्येकाला वाटले असते की ही एक प्रमोशनल स्ट्रॅटेजी आहे.

राणी मुखर्जी म्हणाली – 2020 मध्ये तिचा गर्भपात झाल्यानंतर 10 दिवसांनी, मिसेस चॅटर्जी vs नॉर्वेजियन चित्रपटाचा निर्माता निखिल अडवाणी तिच्याकडे आला. त्यांनी मला चित्रपटाची कथा सांगितल्यावर मी लगेच हो म्हणाले. या चित्रपटात काम करण्याचे कारण मी माझे मूल गमावले किंवा मी भावुक होऊन या चित्रपटासाठी हो म्हणाले पण असे नाही.

कधी कधी चित्रपटाची स्टोरी लाईन इतकी चांगली असते की ती हृदयाला भिडते. चित्रपटाच्या कथेप्रमाणेच मी त्यावेळीही अशाच परिस्थितीतून जात होते. राणीने आणखी एक धक्कादायक गोष्ट सांगितली की, त्यावेळी चित्रपटाच्या निर्माता, दिग्दर्शकासह संपूर्ण टीमपैकी कोणालाही याची माहिती नव्हती. त्यांनाही हे आता कळेल आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

अनुपम खेर- भीगा हुआ आदमी बारिश से नहीं डरता… (Anupam Kher- Bhiga huwa aadmi barish se nahi darta…)

- आप 'मेट्रो... इन दिनों' फिल्म में रिश्ते और इमोशन के मकड़जाल को देखेंगे. इसमें…

July 7, 2025

कहीं आप ख़ुद को चीट तो नहीं कर रहीं? करें रियलिटी चेक (Are you cheating yourself? Do a reality check)

कई बार हम अपनी ज़िंदगी में इतने उलझ जाते हैं कि वास्तविकता को देखने की…

July 7, 2025

कहानी- बचपन जैसी बारिश (Short Story- Bachpan Jaisi Barish)

''वाह आशा! कितना मज़ा आ रहा‌ है बारिश में, सच्ची तुमने तो बचपन की याद…

July 7, 2025
© Merisaheli