Marathi

दुआची मीडियासोबत खास भेट, दीपिका रणवीरची खास विनंती (Ranveer Singh-Deepika Padukone introduce baby Dua to paparazzi)

बॉलिवूडमधील पॉवर कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी अलीकडेच मीडियासाठी भेट आणि शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात या जोडप्याने माध्यमांसोबत त्यांचे फोटो काढले. आणि त्यांनी त्यांची मुलगी दुआ पदुकोण सिंग हिचीही मीडियाशी ओळख करून दिली.

गेल्या वर्षी, बॉलिवूडमधील रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांना एका गोंडस मुलीचा आशीर्वाद मिळाला होता जिचे नाव त्यांनी दुआ पदुकोण सिंग ठेवले. आतापर्यंत या जोडप्याने त्यांच्या मुलीचा चेहरा जगासमोर उघड केलेला नाही. दुसरीकडे, मीडिया आणि या जोडप्याचे चाहते देखील नवीन बाळ मुलीची एक झलक पाहण्यासाठी आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्टवर लोकप्रिय पापाराझी योगेन शाह दिसला. यादरम्यान, योगेन शाहने सांगितले की तो रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांची मुलगी दुआ पदुकोण सिंगला भेटला होता. त्या जोडप्याने मुलीशी ओळख करून देण्यासाठी एक मीटिंग आयोजित केली.

खरंतर, घडलं असं की दुआच्या जन्मानंतर काही महिन्यांनी, त्या जोडप्याच्या मॅनेजरने मीडियाच्या लोकांना फोन केला. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी माध्यमांसाठी ‘मीट अँड ग्रीट’ हा खास कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात त्याने सर्वांना बेबी दुआची ओळख करून दिली. दुआ आई दीपिकाच्या कुशीत होती. रणवीरने माध्यमांना बोलावून त्या मुलीचा चेहरा दाखवला. दुआ तिच्या आईवडिलांसारखीच दिसते. ती खूप गोंडस आहे.

यासोबतच, या जोडप्याने माध्यमांना एक खास विनंती केली. या जोडप्याने माध्यमांना विनंती केली की त्यांना कम्फर्टेब्ल वाटत नाही तोपर्यंत त्यांनी मुलीचे फोटो काढू नयेत.

दीपिका पदुकोण सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. सध्या ती तिची मुलगी दुआची पूर्ण काळजी घेत आहे. व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, ही अभिनेत्री एका ब्युटी ब्रँडसाठी काम करते आणि सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025

कहानी- वो लड़की कम हंसती है… (Short Story- Who Ladki Kam Hasti Hai…)

नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…

July 3, 2025

आपके मोबाइल की बैटरी की सबसे ज़्यादा खपत करते हैं ये ऐप्स (These Apps Drain Your Phone’s Battery the Most)

आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…

July 2, 2025
© Merisaheli