Entertainment Marathi

बिग बॉस ओटीटी ३च्या घरात पहिल्यांदाच अभिनेता रणवीर शौरी पूजा भट्टबरोबर झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलता झाला… (Ranvir Shorey 1st Time Reacts On Breakup With Pooja Bhatt On Bigg Boss Ott 3)

अवघ्या काही दिवसांमध्ये ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं आहे. पहिल्या आठवड्यात स्पर्धकांचा सहभाग पाहून प्रेक्षकांनी या पर्वाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. हे पर्व कंटाळवाण असल्याचं म्हटलं जातं होतं. पण दुसऱ्या आठवड्यानंतर ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाला चांगलं वळणं आलं आहे. स्पर्धक टास्कमध्ये जबरदस्त खेळताना दिसत आहे. त्यामुळे हळूहळू या पर्वाची देखील लोकप्रियता वाढत आहेत. या पर्वात स्पर्धक म्हणून सहभाग झालेला अभिनेता रणवीर शौरीने नुकतंच पूजा भट्टबरोबर झालेल्या ब्रेकविषयी भाष्य केलं.

यावेळी अभिनेता रणवीर शौर आपल्या आईच्या निधनाविषयी खुलेपणाने बोलत होता. तो म्हणाला, “जेव्हा मी २००२ साली लडाखमध्ये ‘लक्ष्य’ चित्रपटाचं चित्रीकरण करत होता. तेव्हा घरून मला एक फोन आला की, आईची तब्येत ठीक नाहीये. पण चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्याशिवाय सेटच्या बाहेर जाऊ शकत नव्हतो. अशातच जेव्हा मी मुंबईत परतलो तेव्हा आईला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.”

पुढे रणवीर शौरी पूजा भट्टचं नाव न घेता म्हणाला, “याच वेळी एका अभिनेत्रीबरोबर आयुष्यातल्या सर्वात मोठ्या घोटाळ्यात अडकलो होतो. हे प्रकरण हाताळण्यात मी अपयशी झालो होतो. त्यामुळे माझ्या भावाने काही काळासाठी त्याच्याबरोबर मला अमेरिकेला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. मी अमेरिकेला सहा महिन्यांचं अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आणि माझ्या भावाकडून पैसे उधार घेतले. अमेरिकेहून परतल्यानंतर मी २००५मध्ये ‘द ग्रेट इंडियन कॉमेडी शो’चं चित्रीकरण सुरू केलं. याच वेळी माझे दोन अडकलेल्या चित्रपटांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. एका आठवड्याच्या अंतराने दोन्ही चित्रपट लागोपाठ प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटातील माझं काम प्रेक्षकांना खूप आवडलं. त्या दोन चित्रपटामुळे मला अखेर वाटलं, अभिनेता म्हणून माझं आयुष्य स्थिर झालं असून मी यशस्वी झालो आहे.”

 ‘जिस्म’ या चित्रपटाच्या दरम्यान रणवीर शौरी आणि पूजा भट्ट प्रेमकहाणी सुरू झाली. सुरुवातीला दोघं चांगले मित्र होते. पण नंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. एवढंच नाहीतर दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पण हे नातं अधिक काळ टिकू शकलं नाही. पूजाने या ब्रेकअपला शौरीलाच कारणीभूत ठरवलं. रणवीर तिच्याशी गैरवर्तणूक करत होता, मद्याच्या आहारी गेला होता आणि अनेकदा मारहाण केल्याचा आरोपही तिने केला होता. पण रणवीरने मात्र वेगळंच कारण सांगितलं. त्याने पूजाची गोष्ट उलट असल्याचंच सांगितलं.

एका मुलाखतीमध्ये त्याने ब्रेकअपच्या दिवशी नेमकं काय घडलं, हे स्पष्ट केलं होतं. नेहमीप्रमाणे तो पूजाच्या घरी होता. इतर जोडप्यांमध्ये ज्याप्रमाणे भांडणं होतात, तसंच यांच्यामध्येही सुरू झालं. त्यानंतर रणवीरने नातं मोडण्याचा निर्णय घेतला. कारण परिस्थिती हाताबाहेर गेली होती. त्यामुळे अभिनेत्याने स्वतःची बॅग भरली आणि तो निघून गेला. घराबाहेर गेल्यानंतर रणवीरला आपली दुसरी बॅग विसरल्याचं लक्षात आलं. म्हणून त्याने पूजाला अनेक फोन केले. पण पूजाने फोन उचलले नाहीत. मात्र रणवीर फोन करत राहिला. तितक्यात त्याला काच फुटल्याचा आवाज आला. अभिनेत्याने मागे वळून पाहिलं तर गाडीच्या दोन काचा फोडलेल्या होत्या. बाहेर येऊन पाहिलं तर पूजाचा भाऊ राहुल लोखंडी रॉड घेऊन उभा होता. हे पाहून अभिनेता हैराण झाला. त्यानंतर त्या रॉडने अभिनेत्याला मारहाण करण्यास सुरुवात केली, असं रणवीरने सांगितलं होतं.

दरम्यान, रणवीर शौरीच्या प्रकरणानंतर पूजाच्या आयुष्यात आला मनीष मखीजा. मनीष हा उधम सिंह नावाने प्रसिद्ध होता. तो एक भारतीय व्हीजे आणि मुंबईतील एका रेस्टॉरंटचा मालक होता. सुरुवातीला पूजा व मनीषची चांगली मैत्री झाली. मैत्रीनंतर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. २००३मध्ये दोघांनी लग्न केलं. पण पूजाचं हे नातंदेखील काही काळातच तुटलं. लग्नाच्या ११ वर्षांनंतर पूजाने मनीष मखीजाबरोबर घटस्फोट घेतला.

तसंच पूजा भट्टनंतर रणवीर शौरीने २०१०मध्ये अभिनेत्री कोंकणा सेन शर्माबरोबर लग्न केलं. २०११मध्ये दोघांना मुलगा झाला; ज्याचं नावं हारुन आहे. पण रणवीर व कोंकणाचही नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. २०१५ दोघांचा नातं संपुष्टात आलं. पण आता दोघं मिळून मुलाचं संगोपन करत आहेत.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025

कहानी- वो लड़की कम हंसती है… (Short Story- Who Ladki Kam Hasti Hai…)

नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…

July 3, 2025

आपके मोबाइल की बैटरी की सबसे ज़्यादा खपत करते हैं ये ऐप्स (These Apps Drain Your Phone’s Battery the Most)

आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…

July 2, 2025
© Merisaheli