मेकअपच्या मदतीने चेहर्यातील दोष लपवून मिनिटांत परफेक्ट लूक मिळवता येतो. त्यासाठी या टिप्स अजमावून पाहाच.
प्रत्येक जण नाकीतोंडी परफेक्ट असतोच, असं नाही. कुणाचे डोळे सुंदर असतात, तर नाक मोठं-पसरट असतं. कुणाचं कपाळ प्रमाणबद्ध असतं, तर ओठ मोठे असतात. संपूर्ण चेहरा प्रमाणबद्ध आणि आखीव-रेखीव असलेली एखादीच ऐश्वर्या राय असते. पण म्हणून इतरांना सुंदर दिसण्याचा हक्क नाही, असं नाही. आपले नाक, डोळे, ओठ, कपाळ कसंही असलं तरी योग्य प्रकारे मेकअप करून तुम्हीही परफेक्ट दिसू शकता, तेही अगदी काही मिनिटांत. त्यासाठी या टिप्स अजमावून पाहाच.
डोळे लहान आहेत?
तुमचे डोळे अगदी लहान असतील आणि काजळ लावल्यानंतर चांगले दिसत नसतील, तर तुम्हाला आय मेकअपची पद्धत बदलायला हवी. तुम्ही पांढर्या रंगाच्या आय पेन्सिलचा वापर करा. यामुळे तुमचे डोळे मोठे दिसू लागतील. तसंच आय लायनर अतिशय बारीक लावा. अशा प्रकारे तुमचे डोळे मोठे आणि सुंदर दिसतील.
कपाळ मोठं आहे?
बरेचदा कपाळ मोठं असलं की, योग्य हेअर स्टाईलची निवड करणं कठीण होतं. मोठं कपाळ लपवण्यासाठी फ्रिंज किंवा फ्लिक्स हेअर कटचा पर्याय निवडायला हवा. याद्वारे तुमच्या कपाळाची लांबी लपवता येईल.
ओठ जाड आहेत?
ओठ जाड असले की, कोणत्या रंगाची लिपस्टिक लावावी हा प्रश्न हमखास सतावतो. अशा मुलींनी लिप मेकअप विचारपूर्वक करायला हवा. लिप मेकअप करण्यासाठी गडद रंगछटेची मॅट लिपस्टिक वापरा. तसंच लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप पेन्सिलच्या साहाय्याने ओठांच्या थोडं आतल्या बाजूने आऊटलाइन करा.
नाक पसरट आहे?
टोकदार सरळ नाक नेहमीच शोभून दिसतं. तुमचं नाक तसं नसलं, तरी हरकत नाही. मेकअपच्या मदतीने तुम्ही स्वतःचं नाक तसं करू शकता. त्यासाठी मेकअप करताना गडद तपकिरी रंगछटेने नाकाची कंटोरिंग (लांबीमध्ये) करा. यामुळे तुमचं नाक बारीक दिसेल. नाका प्रमाणेच तुम्ही चिकबोन्सचीही कंटोरिंग करू शकता.
चिकबोन्स उभारलेले आहेत?
चिकबोन्स मुळातच उभारलेले असले की, थोडा जरी ब्लशर वापरला की ते अधिकच हायलाइट होतात. अशा वेळी सॉफ्ट मेकअप करायला हवा. ब्लशरही गुलाबी किंवा पिच यासारख्या सौम्य रंगछटेचा लावला पाहिजे. तसंच चिकबोन्स झाकले जातील अशा प्रकारे हेअर स्टाईल केली पाहिजे.
कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में दयाबेन का मुख्य किरदार निभाने वाली दिशा…
रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…
देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) इन दिनों स्पिरिचुअल जर्नी पर हैं और पति शाहनवाज़ (Shanwaz Shaikh)…
नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…
'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) स्टार रोहित पुरोहित (Rohit Purohit)…
आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…