Entertainment Marathi

जिनिलीया गरोदर असल्याच्या सर्व चर्चांवर रितेशने सोडलं मौन… (Riteish Deshmukh Comment On Wife Genelia Deshmukh Pregnancy)

गेल्या काही दिवसांपासुन जिनिलीया देशमुख गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. एका इव्हेंटमध्ये जिनिलीया आणि रितेश सहभागी झाले होते. त्यावेळी जिनिलीयाकडे बघून अनेकांनी ती गरोदर असल्याच्या चर्चा सुरु केल्या.

जिनिलीया तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु झाली. बायको गरोदर असल्याच्या या सर्व चर्चांवर रितेशने अखेर मौन सोडलं आहे.

जिनिलीया खरंच गरोदर आहे का? रितेश म्हणतो, “अजुन २ – ३ मुलं असली तरी मला काही हरकत नाही, पण दुर्देवाने या बातमीत काही तथ्य नाही.”

अशाप्रकारे रितेशने जिनिलीया गरोदर नाही, हे स्पष्ट केलंय.

गेल्या २ – ३ दिवसांपासून जिनिलीया तिसऱ्यांदा गुड न्युज देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. एका फॅशन इव्हेंटमध्ये जिनिलीया आणि रितेश या दोघांचा फोटो बातमीचा विषय झाला आहे. या दोघांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. पण आता रितेशने स्पष्टच सांगून या सर्व अफवा असल्याचं सांगितलंय.

बॉलीवूडमधील सर्वात क्युट कपल म्हणून रितेश आणि जिनिलीयाकडे पाहिले जाते. २ फेब्रुवारी २०१२ रोजी रितेश आणि जेनेलियाचे लग्न झाले. २०१४ मध्ये त्यांना मुलगा झाला त्याचे नाव रियान, त्यानंतर २०१६ मध्ये जेनेलिया दुसऱ्यांदा आई झाली.

या वर्षी रितेश – जिनिलीयाचा वेड सिनेमा खूप गाजला. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. रितेश – जिनिलीयाला पुन्हा एकदा एकत्र बघण्यासाठी त्यांचे फॅन्स उत्सुक आहेत.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

‘आई उदे गं अंबे…’ मालिकेच्या स्पर्धेत कोल्हापूरच्या चाहतीने जिंकली साडेतीन तोळ्यांची सुवर्णमुद्रा (Homemaker From Kolhapur Wins Gold Coin In ‘Aai Ude Ga Ambe…’ Serial’s Contest)

टीव्ही मालिकांमुळे केवळ मनोरंजन होतं असं नाही तर चाहत्यांची स्वप्न देखिल पूर्ण होऊ शकतात. कोल्हापूरच्या…

November 25, 2024

6 Little things that make you sexily irresistible

There are times when passion fades out of a relationship, making it seem dull and…

November 25, 2024

कपल्स में दरार की वजह न बनें फाइनेंशियल हैबिट्स (Financial Habits Should Not Become The Cause Of Rift In Couples)

केस 1ः विधि और निखिल का विवाह हुए अभी 6 महीने भी नहीं हुए थे…

November 24, 2024

कहानी- निमकी (Short Story- Nimkee)

एक अशिक्षित, मगर समझदार रानी के कथन से मुझे लगा कि जैसे किसी ने मेरे…

November 24, 2024
© Merisaheli