Marathi

गरोदरपणामुळे हातच्या ब्रॅण्ड अॅण्डॉर्समेंण्ट गेल्या… रुबिना दिलैकने सांगितला तो किस्सा (Rubina Dilaik Opens Up About Losing Brand Endorsements Due To Pregnancy)

रुबिना दिलैक तिच्या गरोदरपणाच्या नवव्या महिन्यात आहे. लवकरच रुबिना आणि अभिनव शुक्ला त्यांच्या बाळाचे स्वागत करणार आहेत. रुबीना सध्या तिच्या किसी ने बता नही या शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये रुबीना तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे करताना दिसत आहे.

शोच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये भारती सिंह रुबिनासोबत दिसली होती आणि त्यात त्यांनी अनेक रंजक गोष्टींबद्दलही चर्चा केली. दरम्यान, रुबिनाने तिचा पती अभिनव शुक्ला गरोदरपणात तिची कशी काळजी घेतो हे सांगितले.

रुबीनाने सांगितले की, आम्ही 9 वर्षे एकत्र आहोत, 4 वर्षे रिलेशनमध्ये होतो आणि लग्नाला 5 वर्षे झाली आहेत, प्रत्येक वेळी प्रत्येक भांडणानंतर मीच अभिनवची माफी मागितली होती, पण या 9 महिन्यांत तो उघडपणे माफी मागताना पाहायला मिळतेय, त्याची चूक नसली तरी तो सॉरी बोलत राहतो.

याशिवाय रुबिनाने सांगितले की, गर्भधारणेचे ९ महिना लागताच मला स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येऊ लागले. एका रात्री मी अभिनवच्या नावाने ओरडले. अभिनव अचानक जागा झाला कारण त्याला वाटले की मला हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळ आली आहे. मी म्हणाले की मला स्नायू क्रॅम्प आहेत, त्यानंतर त्याने तासभर माझ्या पायाची मालिश केली.

याशिवाय रुबिनाने भारतीसोबत तिच्या गरोदरपणाच्या अनुभवावर चर्चा केली. प्रेग्नेंसीनंतर तिच्याकडून किती ब्रँड एंडोर्समेंट हिसकावून घेतल्या गेल्या हे देखील रुबिनाने स्वतः सांगितले. रुबीना म्हणाली की, सुरुवातीचे तीन महिने मी माझ्या प्रेग्नेंसीबद्दल गप्प राहिले आणि जेव्हा मला ही बातमी शेअर करायला सोयीस्कर वाटले तेव्हा मी प्रेग्नेंसीची घोषणा केली. यानंतर मी पन्नास टक्के ब्रँड सहयोग गमावला. आता गावी जाऊन शेती करणे योग्य ठरेल असे वाटते.

व्हिडिओ https://www.instagram.com/reel/C0dvtO1IDGC/?igshid=MzRlODBiNWFlZA==

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कद्दू के उपयोगी घरेलू नुस्ख़े (Useful home remedies of pumpkin)

कद्दू में विटामिन ए, सी व ई के साथ-साथ फाइबर, पोटैशियम, बीटा-कैरोटीन पाए जाते हैं,…

July 5, 2025

काजोल- यहां हर‌ फ़ैसला एक कुर्बानी है… (Kajol- Yahaan har faisla ek kurbani hai…)

- 'मां' एक माइथोलॉजिकल हॉरर मूवी है. इसमें मैं लोगों को इतना डराउंगी... इतना डराउंगी…

July 5, 2025

पुरुषों के इन हेल्थ सिग्नल्स को न करें नज़रअंदाज़ (Men’s health: Critical symptoms that should never be ignored)

पत्नी, बच्चों और घर के दूसरे सदस्यों के जरा-सा बीमार पड़ने पर अक्सर पुरुष तुरंत…

July 5, 2025

कहानी- वे दोनों‌ (Short Story- Ve Dono)

"बाकी जो समय बचेगा, उसमें हम दोनों पुराने दिनों के सहारे जी लिया करेंगे." "ठीक…

July 5, 2025
© Merisaheli