बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सैफच्या बाबत समोर आलेल्या त्या बातमीनं त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
सैफच्या गुडघ्याला आणि खांद्याला मोठी दुखापत झाली असून त्याला फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमर उजालानं याबाबत वृत्त दिले आहे. सैफच्या गुडघ्याला नेमक्या कोणत्या कारणामुळे दुखापत झाली याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफच्या सोबत त्याची पत्नी करिना कपूर रुग्णालयात आहे. सैफ हा त्याच्या एका चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त असताना त्याला त्या चित्रपटाच्या सेटवर अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात त्याच्या खांद्याला अन् गुडघ्याला दुखापत झाली आहे. वैद्यकीय उपचारानंतर त्याला डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सैफच्या त्या बातमीनं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सैफ हा तसा सोशल मीडियापासून लांब राहणारा सेलिब्रेटी आहे. त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कुणीही ढवळाढवळ केलेली आवडत नाही.
- आप 'मेट्रो... इन दिनों' फिल्म में रिश्ते और इमोशन के मकड़जाल को देखेंगे. इसमें…
कई बार हम अपनी ज़िंदगी में इतने उलझ जाते हैं कि वास्तविकता को देखने की…
शेफाली जरीवाला के निधन से उनके हसबैंड पराग त्यागी, पूरी फैमिली और उनके फैंस दुखी…
''वाह आशा! कितना मज़ा आ रहा है बारिश में, सच्ची तुमने तो बचपन की याद…
तमिल सुपर स्टार विष्णु विशाल और टॉप बैडमिंटन खिलाड़ी ज्वाला गुट्टा के घर 22 अप्रैल…
ये तो आप जानते हैं कि बॉलीवुड स्टार बनने के बाद भी काफी सालों तक…