Marathi

सलमान खानच्या ऑडिशनचा व्हिडिओ पाहिलात का? पहिल्याच टेकमध्ये मिळालेला नकार (Salman khan Audition Video Viral On Internet)

सलमानच्या वाढदिवसानिमित्त एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्याची ऑडीशन सुरु असल्याचे दिसते. विशेष म्हणजे सलमानचे हे ऑडिशनही नाकारण्यात आले होते. हा ऑडिशन व्हिडिओ सलमान खानच्या ‘मैने प्यार किया’ या पहिल्या लोकप्रिय चित्रपटातील आहे.

या व्हिडिओमध्ये सलमान ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसत आहे. दुसऱ्या एका मुलाखतीत याच सिनेमाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी सांगितले होते की, यापूर्वी सलमानला या भूमिकेसाठी नकार देण्यात आला होता. राजश्री प्रॉडक्शनच्या बहुतांश चित्रपटांनी त्या काळात चांगली कामगिरी केली नव्हती, त्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती खराब होती आणि त्यांच्यासोबत काम करण्यास कोणताही अभिनेता तयार नव्हता, असेही त्यांनी सांगितले होते.

पुढे ते म्हणाले ‘एक दिवस मला एक मुलगा भेटला, त्याला त्याच्या पहिल्या स्क्रीन टेस्टनंतर आम्ही नाकारले होते. पण त्याच्यात काहीतरी होते, म्हणून पाच महिन्यांनी आम्ही त्याला पुन्हा बोलावले. तो दुसरा तिसरा कोणी नसून सलमान खान होता.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एकाने म्हटले आहे – कोणास ठाऊक होते की हा चेहरा एक दिवस बॉलिवूडवर राज्य करेल.

Akanksha Talekar

Recent Posts

त्या पहिल्या भेटीत… (Short Story: Tya Pahilya Bhetit)

मनोहर मंडवालेकुणाच्या तरी धक्क्यानं अभय भानावर आला. एवढ्या गर्दीतही त्याच्या डोळ्यांसमोरील त्या अनामिकेची धुंदी काही…

April 29, 2024

शिल्पा शेट्टीने मुलांसह घेतले मंगलोरच्या देवीचे दर्शन, शेअर केला व्हिडिओ आणि फोटो (Shilpa Shetty Watches ‘Daiva Kola’ In Mangalore With Kids)

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिचा पारंपारिक परफॉर्मन्स पाहण्यासाठी तिची दोन मुले विवान- समिक्षा आणि तिची…

April 29, 2024

लघुकथा- डेड (Short Story- Dead)

जब से बाबूजी यहां आए थे, तब से परिवार में असंतोष व्याप्त था, कभी उनकी डकार…

April 29, 2024

मंगलौर में शिल्पा शेट्टी ने बच्चों के साथ देखा ‘देवा कोला’ शेयर किया वीडियो, बोली- वापस अपनी जड़ों की तरफ (Shilpa Shetty Watches ‘Daiva Kola’ In Mangalore With Kids, Says- Back To My Roots)

बॉलीवुड एक्ट्रेस शिल्पा शेट्टी अपने होम टाउन मंगलौर में अपने दोनों बच्चों विवान- समीक्षा और…

April 29, 2024

आमिरने वयाच्या ४४व्या वर्षी साकारला १८ वर्षांचा रँचो, लोक हसतील अशी होती भिती (Aamir Khan Almost Refused Rajkumar Hirani’s 3 Idiots At Age 44 But Ended Up Doing It Because…)

आमिर खानने थ्री इडियट्‌स या चित्रपटामध्ये १८ वर्षाच्या कॉलेज तरुणाची रँचोची भूमिका साकारली होती. ही…

April 29, 2024
© Merisaheli