सलमानच्या वाढदिवसानिमित्त एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्याची ऑडीशन सुरु असल्याचे दिसते. विशेष म्हणजे सलमानचे हे ऑडिशनही नाकारण्यात आले होते. हा ऑडिशन व्हिडिओ सलमान खानच्या ‘मैने प्यार किया’ या पहिल्या लोकप्रिय चित्रपटातील आहे.
या व्हिडिओमध्ये सलमान ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसत आहे. दुसऱ्या एका मुलाखतीत याच सिनेमाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी सांगितले होते की, यापूर्वी सलमानला या भूमिकेसाठी नकार देण्यात आला होता. राजश्री प्रॉडक्शनच्या बहुतांश चित्रपटांनी त्या काळात चांगली कामगिरी केली नव्हती, त्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती खराब होती आणि त्यांच्यासोबत काम करण्यास कोणताही अभिनेता तयार नव्हता, असेही त्यांनी सांगितले होते.
पुढे ते म्हणाले ‘एक दिवस मला एक मुलगा भेटला, त्याला त्याच्या पहिल्या स्क्रीन टेस्टनंतर आम्ही नाकारले होते. पण त्याच्यात काहीतरी होते, म्हणून पाच महिन्यांनी आम्ही त्याला पुन्हा बोलावले. तो दुसरा तिसरा कोणी नसून सलमान खान होता.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एकाने म्हटले आहे – कोणास ठाऊक होते की हा चेहरा एक दिवस बॉलिवूडवर राज्य करेल.
कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में दयाबेन का मुख्य किरदार निभाने वाली दिशा…
रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…
देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) इन दिनों स्पिरिचुअल जर्नी पर हैं और पति शाहनवाज़ (Shanwaz Shaikh)…
नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…
'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) स्टार रोहित पुरोहित (Rohit Purohit)…
आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…