डिसेंबर महिना आला की बॉलिवूडमधील बहुतांश सेलिब्रेटी सहलीसाठी लंडनला धाव घेतात. काही दिवसांपूर्वीच पतौडी कुटुंबसुद्धा विमानतळावर दिसलं होतं. आता साराने सुद्धा काही फोटो पोस्ट केले आहेत जे पाहून चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत.
साराने आपल्या आई आणि वडीलांसोबत ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो शेअर केलेत. त्यामुळे सारासाठी अमृता आणि सैफ एकत्र आल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला. पण यावेळी त्यांच्यासोबत अभिनेत्रीचा छोटा भाऊ इब्राहिम अली खान नव्हता. साराने आपल्या पोस्टमधून त्याची आठवण काढली.
सारा अली खानचा भाऊ इब्राहिम अली खान या सहलीला गेला नाही त्यामुळे अभिनेत्रीला त्याची खूप आठवण येत असल्याचे तिने पोस्टमधून व्यक्त केले आहे.
सारा अली खानने इन्स्टाग्रामवर चार फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती तिची आई अभिनेत्री अमृता सिंह आणि वडील सैफ अली खानसोबत दिसत आहे. पहिल्या फोटोमध्ये सारा आई अमृतासोबत लंडनच्या रस्त्यावर फोटोसाठी पोज देत आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या फोटोमध्ये ती वडील सैफसोबत पोज देत आहे. शेवटच्या फोटोत अभिनेत्रीने सेल्फी शेअर केला आहे.
हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझ्या लहान भावाची मला या ख्रिसमसला आठवण येत आहे, धन्यवाद सांता… तू इथे असतास तर…. पेकन पाई खाणे, सेलिब्रेट करणे, ख्रिसमसचा आनंद साजरा करणे आणि नंतर ब्लॅक कॉड खाणे यासांरख्या गोष्टी आपल्याला नेहमीच खूप आवडतात पण तू आता इथे नाहीस तर मी केवळ फोटोच शेअर करते.
सारा अली खानचे काम
सारा अली खान शेवटची ‘जरा हटके जरा बचके में’ मध्ये दिसली होती. आता ही अभिनेत्री लवकरच ‘ए वतन मेरे वतन में’ या सिनेमात दिसणार आहे.
सोशल मीडिया पर राधिका मदान (Radhikka Madan) की तस्वीर वायरल हो रही है, इस तस्वीर…
कॉस्मेटिक्स आपके चेहरे को कितना नुक़सान पहुंचा सकते हैं, यह कई बातों पर निर्भर करता…
कभी बॉलीवुड के हीरो नम्बर 1 रह चुके गोविंदा (Govinda) की लाइफ में पिछले कुछ…
हाल ही में दिए एक इंटरव्यू में जाट एक्टर रणदीप हुड्डा (Randeep Hooda) इस बात…
कई बार एकांत में दबे कदमों एक प्रश्न मेरे सामने आ खड़ा होता- नारी मुक्ति…
बॉलीवुड के क्यूटेस्ट कपल रणबीर कपूर (Ranbir Kapoor) और आलिया भट्ट (Alia Bhatt) अपनी रोमांटिक…