प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकरचा बुधवारी (१९ मार्च रोजी) वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस ‘सुका सुखी’ मध्ये साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला अंकिता वालावलकर व तिचा पती कुणाल भगत यांनी हजेरी लावली होती. अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर दोन पोस्ट केल्या आहेत.
सत्या मांजरेकर याने दोन वर्षांपूर्वी व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं. सत्याचे हॉटेल मुंबईतील गोरेगाव परिसरात आहे. ‘सुका सुखी’ असे या हॉटेलचे नाव आहे. या हॉटेलमध्ये अनेक सेलिब्रिटी जेवणाचा आस्वाद घ्यायला जातात. या हॉटेलमधील एक व्हिडीओ बिग बॉस मराठी फेम कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने शेअर केला आहे.
अंकिताने शेअर केलेला पहिला फोटो हॉटेलच्या नावाचा आहे. ‘सुका सुखी’ मांजरेकरांच्या स्वयंपाकघरातून असं त्यावर लिहिलं आहे.
तर, अंकिताने दुसरा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सत्या मांजरेकरच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत सत्याबरोबर त्याचे वडील महेश मांजरेकर, आई मेधा मांजरेकर, बहीण सई मांजरेकर व इतर काही जण दिसत आहे. सर्वजण केकचा आस्वाद घेताना व्हिडीओत पाहायला मिळत आहे. अंकिता व कुणाल यांनी अंकुश चौधरीबरोबर काढलेला फोटोही यात दिसतोय.
अंकिताने शेअर केलेला सेलिब्रेशनचा व्हिडीओ (फोटो – इन्स्टाग्राम)
सत्या मांजरेकरच्या या हॉटेलमध्ये अस्सल मालवणी पदार्थांचा आस्वाद घेता येतो. अनेक शाकाहारी आणि मासांहारी पदार्थ या हॉटेलमध्ये मिळतात. याठिकाणी अनेक सेलिब्रिटी जेवणाचा आस्वाद घ्यायला जातात. नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मांजरेकरांच्या हॉटेलला भेट दिली होती.
“सुका सुखी’ हे सुरू करण्याची कल्पना आणि स्वप्न हे माझ्या वडिलांनी पाहिले होते. घरगुती पदार्थ लोकांना खायला मिळावेत हे यामागचे कारण होते. त्यामुळेच आम्ही ‘सुका सुखी’ची सुरुवात केली. पौष्टिक, स्वादिष्ट आणि घरगुती अन्न पोहोचण्यासाठी आम्ही हा मार्ग निवडला”, असं सत्याने या हॉटेलच्या कल्पनेबद्दल बोलताना सांगितलं होतं.
कुछ दिन पहले निशा रावल और उनके 7 वर्षीय बेटे कविश (Nisha Rawal And Her…
लोकप्रिय मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे… आपल्या मातीशी आणि संस्कृतीशी नाळ जोडून असलेलं…
हॉट समर सीज़न में अपने पार्टनर से दूरियां बढ़ाना और सेक्स के लिए बार-बार ना…
निर्माता अभिषेक अग्रवाल यांच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित बहुप्रतिक्षित…
"ध्यान से सुन लो बुआ, वह व्यक्ति तुम्हारा भाई हो सकता है, मेरा पिता या…
काजोल (Kajol) की बहन और आने ज़माने की दिग्गज एक्ट्रेस तनुजा की बेटी तनीषा मुखर्जी…