बॉलिवूडचा किंग खान आणि त्याच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. कारण आज सुपरस्टार शाहरुखचा आज ५८ वा वाढदिवस आहे.
वर्षांच्या सुरुवातीलच रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या पठाणने बॉलिवूडचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. त्यानंतर जवान रिलीज झाला तोही तसाच सुपरहिट झाला.
आता त्याचा यावर्षीचा शेवटचा सिनेमा डंकी रिलीज होतोय. शाहरुखच्या ‘डंकी’ चित्रपटाशी संबंधित व्हिडिओ आजच्या या खास दिवशी येणार होता आणि आता त्याची प्रतीक्षा संपली आहे. राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटाची झलक अखेर समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानचा ‘डंकी’ हा एक कॉमेडी ड्रामा आहे. ‘डंकी फ्लाइट’ नावाच्या बेकायदेशीर इमिग्रेशनच्या तंत्रावर ही कथा आधारित आहे. याचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केले आहे.
डंकीमध्ये शाहरुख खान सोबत तापसी पन्नू, दिया मिर्झा, बोमन इराणी, विकी कौशल यांच्या महत्वपूर्ण भूमिका असतील. त्यांच्याशिवाय धर्मेंद्र, सतीश शहा, परीक्षित साहनी हे कलाकार सुद्धा डंकीमध्ये दिसणार आहेत. अभिनेत्री काजोलचा यात कॅमिओ असणार आहे.हा चित्रपट २१ डिसेंबर रोजी परदेशात आणि २२ डिसेंबर २०२३ रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे.
आवश्यक है कि हम अपने लिए खड़ी करते रहें नियमित कुछ चुनौतियां स्वयं को मशीन…
गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने संजूच्या करिअरची सुरुवात झाली. ‘बाप्पावाला गाणं’ हे त्याचं पहिलं गाणं सोशल मीडियावर…
पापुलर टीवी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' के पुराने रोशन सिंह उर्फ गुरुचरण सिंह…
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या अभिनयाने तसेच वागण्याने लोकांची मने जिंकतो. तो आपल्या भावना अत्यंत…
आखिर आपकी जिंदगी का सबसे खास शख़्स यानि आपका जीवनसाथी कैसा होगा, यह एक ऐसा…
मनोहर मंडवालेकुणाच्या तरी धक्क्यानं अभय भानावर आला. एवढ्या गर्दीतही त्याच्या डोळ्यांसमोरील त्या अनामिकेची धुंदी काही…