काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकने निकाहाचे फोटो शेअर करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. विशेष म्हणजे हा त्याचा तिसरा निकाह असून यापूर्वी त्याचे भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाशी लग्न झाले होते.
शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी तिसरे लग्न केले आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचे २०१० मध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या ८ वर्षानी त्यांना मुलगा झाला ज्याचे नाव त्यांनी इझान असे ठेवले. पण आता सानिया आणि शोएब वेगळे झाले आहेत.
हे प्रकरण गरम असतानाच सोशल मीडियावर शाहरुख खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात किंग खानसोबत सानिया मिर्झा आणि शोएब मलिकही दिसत आहेत. व्हिडिओमध्ये शाहरुख शोएबकडे बोट दाखवत सानियाला विचारतो- खरं सांग, तू ह्याच्यामध्ये असं काय पाहिलं की तू पटकन त्याच्याशी लग्न केलंस.
हा देखणा आहे, खेळ देखील छान खेळतो. सर्व काही चांगले आहे पण अशी कोणती वैयक्तिक बाब जास्त भावली? यावर सानियाने उत्तर दिले की- मी तर खूप काही पाहिले यांच्यात, ते खूप लाजाळू आहेत, कसं बोलावं हे तुम्हाला त्यांना शिकावावं लागेल…
यानंतर शाहरुख शोएबला विचारतो, तुला सानियात असे काय आवडले की तू तिच्या प्रेमात पडलास? यावर उत्तर देताना शोएब म्हणाला की, मला हा विचार करायला वेळ मिळण्यापूर्वीच लग्न झाले होते.
मुंबई के ठाणे में इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) के सीजन 2 का फाइनल मैच…
इलियाना डिक्रूज (Iliyana Dcruz) अपने फैंस और चाहने वालों को न्यू ईयर के समय एक…
Despite all the sweets that come your way this festive season, there are ways to…
जॉइंट अकाउंट (संयुक्त खाता) वो खाता होता है, जिसे दो या दो से अधिक लोग…
२०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गेल्या अनेक महिन्यांपासून तुरुंगात असलेला सुकेश चंद्रशेखर अनेकदा तुरुंगातून जॅकलीन…
२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या ठग सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला…