Marathi

‘शका लका बूम बूम’फेम संजू अडकला विवाहबंधनात, कोरिओग्राफर गर्लफ्रेंडशी केलं लग्न (Shaka Laka Boom Boom actor Kinshuk Vaidya ties the knot with girlfriend Diiksha Nagpal )

‘शका लका बूम बूम’ या लोकप्रिय टीव्ही शोचा संजू आठवतोय? संजूची भूमिका करून घराघरात प्रसिद्ध झालेला किंशुक वैद्य वयाच्या ३३ व्या वर्षी बोहल्यावर चढला आहे. त्याने त्याच्या मैत्रिणीशी लग्न केले आहे. किंशुकने स्वतः लग्नाचे फोटो अजून शेअर केले नसले तरी आता त्याच्या लग्नाचे पहिले फोटो समोर आले आहेत.

किंशुक वैद्यने 22 नोव्हेंबर 2024 रोजी त्याची गर्लफ्रेंड दीक्षा नागपाल हिच्याशी अलिबागमध्ये एका अत्यंत खाजगी समारंभात लग्न केले. कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. लग्नाच्या दिवशी वधू-वर पारंपरिक मराठी पोशाखात दिसले. पारंपारिक पांढऱ्या पोशाखात आणि लाल पगडीमध्ये किंशुक नवरा म्हणून छान दिसत होता. तर त्याची बायको दीक्षा हिने साडी नेसली होती आणि तिने महाराष्ट्रीयन लूक देखील कॅरी केला होता. वधू आणि वर म्हणून त्यांची जोडी खूप छान दिसत होती. दोघेही परफेक्ट कपलसारखे दिसत होते.

त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये किंशुक आपल्या वधूला मिठी मारताना दिसत आहे. लग्नानंतर वधू-वरांनी पॅव्हेलियनमध्ये कॅमेऱ्यासाठी अनेक पोज दिल्या ज्यामध्ये दोघेही रोमँटिक करताना दिसत आहेत.

राधाकृष्ण फेम सुमेध मुदगलकरने त्याच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहते उत्साहित झाले आहेत आणि अभिनेत्याला त्याच्या लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना सुमेधने लिहिले की, “लग्नाचे सीन वेडे होणार आहेत.” आता किंशुक लग्नाचे फोटो कधी शेअर करणार याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

किंशुक वैद्यची वधू दीक्षा नागपालबद्दल सांगायचे तर ती एक प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आहे. दीक्षा नागपालने ‘पंचायत 2’ चा आयटम नंबरही कोरिओग्राफ केला आहे. याशिवाय ती शिवशक्ती या टीव्ही शोशी कोरिओग्राफर म्हणूनही जोडलेली आहे.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

कहानी- बॉबी का निर्णय (Short Story- Bobby Ka Nirnay)

"कैसे हो बॉबी?" फोन विनोद का था. दोनों ओर के हालचाल का आदान-प्रदान होने के…

November 23, 2024

Seven Days To A Slimmer You!

Prepping for your wedding can be demanding and stressful; and falling back on stimulants such…

November 23, 2024
© Merisaheli