Marathi

मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येबाबत शरद पोंक्षेंनी व्यक्त केली चिंता, व्हिडिओ शेअर करत मांडले विचार ( Sharad Ponkshe Share Video On Mumbai Pune Population)

अभिनेते शरद पोंक्षे यांनी नुकतेच मुंबईच्या लोकसंख्या वाढीवर आपले मत व्यक्त केले आहे. सोबतच त्यांनी १९९५ मधल्या बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा संदर्भही दिला आहे. परप्रांतीय लोक मुंबईथ येऊन तळ ठोकतात त्यामुळे निसर्गाचीही सतत हानि होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सध्याच्या घडीला देशाची सर्वात मोठी समस्या म्हणजे लोकसंख्या वाढ. दिवसेंदिवस देशाची लोकसंख्या इतक्या झपट्याने वाढत चालली आहे की त्यामुळे निसर्गाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यासर्व गोष्टीवर अभिनेते शरद पोंक्षे यांनी चिंता व्यक्त केली असून सोबत बाळासाहेब ठाकरेंचे शब्द खरे ठरल्याचे सांगितले आहे.

‘’गेली ५० वर्षे मी मुंबईमध्ये राहतो. या ५० वर्षांमध्ये बदलत गेलेली मुंबई मला बघायला मिळाली. आमच्या पिढीने सर्वात जास्त त्रास सहन केला होता. म्हणजे विकासासाठी मुंबईत जी काम काढले जातात जसे की रस्ते, पूल वगैरे सगळं…. आमचं सगळं आयुष्यात काहीतरी बांधकाम सुरू होता त्यामुळे ट्राफिक मध्ये वगैरेच गेलं. त्याबद्दल माझी तक्रार नाही. शहरांचा, देशाचा विकास जर व्हायला हवा असेल तर मग त्रास सहन करायला पाहिजे. पण हे सगळं होत असताना मला हिंदुहृदयसम्राट सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वाक्य आठवतं.’’

‘’ मला त्यांची भाषण भयंकर आवडायची, मी त्यांना फॉलो करायचो. मी त्यांची सगळी भाषण ऐकायला शिवाजी पार्कला गेलो होतो. १९९४-९५ च्या काळात एका भाषणात ते म्हणाले की, मुंबईमध्ये येणारे लोंढे आता थांबायला पाहिजे. १९९४-९५ नंतर येणाऱ्या लोकांना मुंबईमध्ये आत घेऊ नका कारण एक दिवस ही मुंबई फुटेल… आता मुंबईला वाढायला जागा राहिलेली नाही कारण चारही बाजूंनी समुद्र आहे. मुळात ब्रिटिशांनी साथ बेटं एकमेकांमध्ये भरती घालून त्याला मुंबई नावाचा शहर बनवलं होतं. नंतर मग बांद्रापर्यंत ते वाढलं. आणि आता उपनगर वाढत वाढत ते पार पालघर पर्यंत जाऊन पोहोचलं आहे. दुसरीकडे पार डोंबिवली बदलापूर इथपर्यंत जाऊन पोहोचला आहे. माझ्या डोक्यात विचार येतात की, सगळ्या बेटांमध्ये भराव घालून ही मुंबई मोठी केली आहे’’

पोंक्षे पुढे म्हणाले की,  आता ज्या पद्धतीने मुंबईत हे टॉवर्स उभे राहतात ते टॉवर्स बघून आणखी भयानक भीती वाटते. खरंच सांगतो हे कुठे थांबणार का? म्हणजे एकाही राजकीय नेत्याला किंवा राजकीय पक्षाला असं कधी वाटत नाही का की मुंबई पुणे शहरांमध्ये फक्त विकासाचीच काम करून हा एकमेव उपाय नाहीये, सगळ्यात मोठा उपाय आहे तो या शहरांमध्ये येणारे लोंढे थांबवणे. शेवटी प्रत्येक शहराची प्रत्येक राज्याची प्रत्येक देशाची संसाधन पुरवण्याची क्षमता असते. समाजात लोक एकत्र राहतात त्यांना अन्न वस्त्र निवारा पाणी आणि इतर सोयी सुविधा म्हणजेच वीज चांगलं घर चांगले रस्ते चांगले फुटतात सगळ्या प्रकारच्या सुख सोयी, जसे की चांगले मार्केट चांगली भाजी, चांगले मॉल्स अशा सगळ्या गोष्टी असतात. हे शहर शेवटी फुटणार आहे. हे कधी थांबणार आहे का?

उंच इमारती बांधल्या जात आहेत, ते पाहून दडपण येतं. ३०-४० व्या मजल्यावरून पाहताना भीती वाटते खरं सांगतो. ही भयाण मुंबई आहे आता पुणे ही त्याच मार्गावर आलंय. जो उठतो तो मुंबई पुण्यासारख्या शहरात येतोय. बाळासाहेबांचे काय दूरदृष्टी असेल…. १९९५ मध्येच ते म्हणाले होते की आता मुंबईतील लोंढे थांबवण्याची गरज आहे. १९९५ आधीच्या झोपड्या नक्की करा त्याच्यानंतर आता एकही झोपडी होऊ देऊ नका. आजही झोपड्या नव्याने बांधल्या जातात. मग इथले काही आमदार खासदार केव्हा मतांच्या राजकारणासाठी त्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या अनधिकृत लोकांना अधिकृत बनवतात. त्यांना आधार कार्ड दिली जातात त्यांना मीटर दिले जातात हे कुठेतरी थांबवायला हवं…. असं कोणताच राजकीय पक्षाच्या मनात येत नाही का? कसं पुरवणार आहोत सगळे? कचऱ्याचा नियोजन कस करणार आपण? पाणी कसं पुरवणार आहोत? खाली खोदणार तरी किती? आता वांद्रे येणारी माण पॉइंट पर्यंत संपूर्ण अंडरग्राउंड मेट्रो झाली आहे.

 मला भीती वाटते की काही अंतरावर समुद्राचा पाणी आहे तो काला पत्थर सिनेमा आठवतो मला, कुदळ मारता मारता एक एक थेंब यायला सुरुवात झाली आणि काय झालं त्या सिनेमांमध्ये बघितलं ना. या मुंबईचा कधीतरी असं होऊ शकतं.

शरद पोंक्षे पुढे म्हणाले की, मुंबईची लोकसंख्या आता तीन साडेतीन कोटींवर गेली आहे. देशाची ही तिचा अवस्था, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा २०१४ मध्ये निवडून आले तेव्हा सव्वाशे कोटी भारतीय म्हणायचे आता १४० कोटी भारतीय म्हणतात. मग हे जे १५ कोटी वाढलेत हे काय आहे? आपण परदेशात जातो परदेशांमधलं सगळं बघतो तेव्हा आपल्याला अद्भुत वाटतं की कसं सुंदर नियोजन आहे. आपल्या शेजारचा मुस्लिम देश यु ए ई तिथे सगळं किती सुंदर आहे… हे सगळं कसं शक्य आहे तर त्यांच्या लोकसंख्येवर प्रचंड कंट्रोल आहे. एकट्या मुंबईच्या अर्धी लोकसंख्या जपान राष्ट्राची आहे. आपल्यापेक्षा दुप्पट तिप्पट क्षेत्रफळ अमेरिकेचं आहे. माणसं एक चतुर्थांश आहे. आणि आपली १४० कोटी.

 १९४७  साली जे मुसलमान काँग्रेसच्या कृपेने येथे राहिले ते तीन कोटी होते. ७८ वर्षात ते ३० कोटी झाले आहे. म्हणजेच जवळपास १० टक्क्यांनी वाढले. त्यांची जेव्हा लोकसंख्या वाढते तेव्हा काय होतं? आता काही महिन्यांपूर्वी बांगलादेशमध्ये पाहिलं ना ते घडतं. माझ्या राजकीय राजकारण करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांच्या नेतृत्वांना कळकळीची विनंती आहे की, मुंबई पुण्यासारखे शहरातले लोंढे आता थांबवा. खर तर थांबवण्याची फार गरज आहे. ही मुंबई एक दिवस फुटेल.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

कद्दू के उपयोगी घरेलू नुस्ख़े (Useful home remedies of pumpkin)

कद्दू में विटामिन ए, सी व ई के साथ-साथ फाइबर, पोटैशियम, बीटा-कैरोटीन पाए जाते हैं,…

July 5, 2025

काजोल- यहां हर‌ फ़ैसला एक कुर्बानी है… (Kajol- Yahaan har faisla ek kurbani hai…)

- 'मां' एक माइथोलॉजिकल हॉरर मूवी है. इसमें मैं लोगों को इतना डराउंगी... इतना डराउंगी…

July 5, 2025

पुरुषों के इन हेल्थ सिग्नल्स को न करें नज़रअंदाज़ (Men’s health: Critical symptoms that should never be ignored)

पत्नी, बच्चों और घर के दूसरे सदस्यों के जरा-सा बीमार पड़ने पर अक्सर पुरुष तुरंत…

July 5, 2025

कहानी- वे दोनों‌ (Short Story- Ve Dono)

"बाकी जो समय बचेगा, उसमें हम दोनों पुराने दिनों के सहारे जी लिया करेंगे." "ठीक…

July 5, 2025
© Merisaheli