Marathi

इटलीत सुट्यांचा आनंद घेतेय शेहनाज गिल, पाहा सुंदर फोटो ( Shehnaz Gill is enjoying her holidays in Italy, see the beautiful photos)

थायलंडमध्ये मजेत वेळ घालवल्यानंतर शहनाज गिल आता आणखी एक नवीन डेस्टिनेशन एक्सप्लोर करण्यासाठी गेली आहे. नवीन डेस्टिनेशनच्या शोधात शहनाज इटलीला पोहोचली असून सध्या ती इटलीच्या सुंदर खोऱ्यांमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. आपले सुंदर फोटो शेअर करून अभिनेत्री तिथून चाहत्यांना सतत अपडेट्स देत असते.

सलमान खानचा वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस ते तिचा स्वतःचा चित्रपट किसी का भाई किसी की जानपर्यंतचा अप्रतिम प्रवास केलेली शहनाज गिल सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या इटलीतील व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत.

शहनाजने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर इटलीच्या व्हेकेशनचे काही अप्रतिम फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये, अभिनेत्री पांढरा टॉप, लाल फ्लॉवर स्लीव्ह टी-शर्ट आणि निळा डेनिम परिधान करताना दिसत आहे.

यासोबतच तिचा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने मॅचिंग कलरचे सँडल घातले आहे. अभिनेत्री इटलीच्या सुंदर व्हॅलीमध्ये पोज देताना दिसत आहे.
हे सुंदर फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शन लिहिले की, “निसर्गाचा शोध घेताना, तुम्ही स्वतःला शोधता.
एका चाहत्याने तिची स्तुतीत करत लिहिले – मी तुला पाहावे की निसर्गाचे दृश्य पाहावे, माझे हे मन द्विधा मनस्थितीत अडकले आहे. अनेक चाहत्यांनी अभिनेत्रीच्या फोटोंवर फायर आणि रेड हार्ट इमोजी पाठवले आहेत.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कविता- रसिक प्रेम (Poetry- Rasik Prem)

रसिक श्यामलेकर अधरों पर मुस्कानछेड़ वंशिका की तानपुकार रहे राधा नाम राधामन ही मन रिझायेरसिक…

May 20, 2024

कहानी- आख़री ख़त (Short Story- Aakhri Khat)

औरत को ये क़ैद क्यों मिलती है? शायद तुम्हारे मौन का कारण तुम्हारी अपनी क़ैद…

May 20, 2024

Turn Down The Heat

Parenting is hard work. Sometimes, our kids make us feel angry. We will come home…

May 20, 2024

यामी गौतम झाली आई! अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन (Yami Gautam And Director Aditya Dhar Blessed With Baby Boy)

बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं आहे. १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या…

May 20, 2024
© Merisaheli