FILM Marathi

श्रद्धा कपूरला साकारायची आहे या दोन दिग्गज व्यक्तींच्या बायपिकमध्ये भूमिका, पाहा कोण आहेत हे कलाकार (Shraddha Kapoor Wants to be a Part of Biopic of These Two Personalities)

हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध खलनायक शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूर ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे, तिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2010 मध्ये ‘तीन पत्ती’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या श्रद्धाने ‘आशिकी 2’पासून ‘हैदर’पर्यंत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. 2017 मध्ये, श्रद्धाने अंडरवर्ल्ड डॉन आणि दहशतवादी दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारली होती, परंतु आता तिने या दोन व्यक्तिरेखांच्या बायोपिकचा भाग होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

एका रिपोर्टनुसार, श्रद्धाला एका इव्हेंटमध्ये विचारण्यात आले की तिला कोणत्या महान व्यक्तिरेखेच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल. त्यादरम्यान गर्दीतून कोणीतरी अभिनेत्रीसमोर पद्मिनी कोल्हापुरेचे नाव घेतले, यावर अभिनेत्रीने उत्तर दिले की हो मला माझी मावशी पद्मिनी कोल्हापुरेची भूमिका पडद्यावर साकारायला आवडेल. यासोबतच या अभिनेत्रीने स्वर कोकिळा लता मंगेशकर यांच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छाही व्यक्त केली.

बायोपिकमध्ये काम करण्याच्या प्रश्नाबाबत श्रद्धा म्हणाली की, पद्मिनी कोल्हापुरे यांचे सुचवलेले नाव खूप चांगले आहे. पद्मिनी कोल्हापुरे माझी मावशी आहे, मला तिच्या बायोपिकमध्ये काम करायला नक्कीच आवडेल. यासोबतच मला स्वर कोकिळा लता मंगेशकरही साकारायला आवडतील. माझी मावशी आणि लता मंगेशकर यांच्या बायोपिकमध्ये काम करण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी मोठे ध्येय गाठण्यापेक्षा कमी नाही, असे ती म्हणाली.

 लता मंगेशकर आणि श्रद्धा कपूर यांचे एकमेकांशी घट्ट नाते आहे. श्रद्धाची आई शिवांगी ही लता मंगेशकर यांची भाची आहे आणि या नात्यामुळे श्रद्धा लतादीदींच्या नातीसारखी आहे. यामुळेच तिला तिच्या आयुष्यातील या दोन महान व्यक्तींच्या बायोपिकमध्ये काम करायचे आहे.

श्रद्धाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर चार वर्षांपूर्वी श्रद्धा बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये दिसणार होती आणि त्यासाठी ती बॅडमिंटन खेळायला शिकली होती, पण नंतर हा चित्रपट परिणीती चोप्राकडे गेला.

विशेष म्हणजे, सध्या श्रद्धा तिच्या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट ‘स्त्री 2’ साठी चर्चेत आहे. हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जी यांसारखे कलाकार या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहेत, ज्यांची चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत.

(छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम)

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025

कहानी- वो लड़की कम हंसती है… (Short Story- Who Ladki Kam Hasti Hai…)

नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…

July 3, 2025
© Merisaheli