Entertainment Marathi

गानकोकीळेच्या बायोपिकमध्ये झळकणार श्रद्धा कपूर? (Shraddha Kapoor Wished To Work In Lata Mangeshkar Biopic)

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने काहीच दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचं लता मंगेशकर यांच्या खास नातं देखील आहे. श्रद्धा कपूर ही नात्याने लता मंगेशकर यांची नात आहे. लता मंगेशकर यांची अलीकडेच (२८ सप्टेंबरला) ९४वी जयंती साजरी झाली. सध्या लता मंगेशकर यांच्यावर जर बायोपिक बनवला गेला तर, त्यात कोणती अभिनेत्री काम करणार याची चर्चा सुरू झाल्यानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचे नाव समोर आले आहे.

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान श्रद्धाला प्रश्न विचारण्यात आला की, तिला कोणाच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल? तेव्हा तिने उत्तर दिले की, ‘मला लता मंगेशकर साकारायला आवडतील. हे माझं एक मोठं ध्येय आहे.’ यामागे असलेलं खास कारण म्हणजे श्रद्धा कपूर लता मंगेशकर यांच्याशी नात्याने देखील जवळची आहे. शिवाय तिला गाण्याची आवड असल्यामुळे ती गेल्या अनेक वर्षांपासून लता मंगेशकर यांच्याशी सतत संवाद साधायची. त्यांचं हे नातं अतिशय जवळचं होतं.

श्रद्धा कपूरचे आजोबा पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे हे लता मंगेशकर यांचे चुलत भाऊ आहेत. म्हणजेच श्रद्धाची आई शिवांगी कोल्हापुरे आणि तिची बहीण पद्मिनी कोल्हापुरे या नात्याने लतादिदींच्या भाच्या आहेत. लता मंगेशकर यांनी पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासाठी अनेक अविस्मरणीय गाणी गायली होती. तर, श्रद्धा कपूर देखील लता मंगेशकर यांच्याकडून गाण्याचे धडे गिरवत होती.

अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, श्रद्धा तिच्या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट ‘स्त्री २’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट तिच्या २०१८मध्ये आलेल्या ‘स्त्री’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात ती राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबत दिसणार आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

महाराष्ट्राची हास्यजत्रानंतर गौरव मोरे गाजवतोय हिंदी शो, जुही चावलासोबत धमाल जुगलबंदी चर्चेत ( Gaurav More Share Cute Bond With Juhi Chavla On The Set Of Madness Machayege )

महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे ! कॉमेडीची अचूक संधी साधत…

April 24, 2024

फिटनेसचे 15 फायदे (15 Benefits Of Fitness)

नियमित व्यायाम करण्याचे काय फायदे होतात, ते जाणून घ्या आणि निरोगी राहा… आपलं शरीर फिट…

April 24, 2024

मनीषा कोईरालाने माधुरीला घाबरून एक चांगला सिनेमा नाकारला; आज होतोय पश्चाताप (Manisha Koirala Rejected Dil Toh Pagal Hai Due To ‘Insecurity’: ‘Was Pitted Against Madhuri Dixit, Got Scared’)

'हिरामंडी द डायमंड बझार' या सिनेमातून अभिनेत्री मनीषा कोईरालाने बऱ्याच काळाने सिनेविश्वात कमबॅक केलंय. संजय…

April 24, 2024

नोरा फतेहीने साधला पापाराजींवर निशाणा (Nora Fatehi on paparazzi zooming in on her body parts)

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील पापाराजींसोबत जुळून घेणे कलाकारांची गरज किंवा मजबूरी ठरली आहे. अनेकदा कलाकार हे फोटोग्राफर्सच्या…

April 23, 2024
© Merisaheli