मराठमोळी अभिनेत्री स्मिता तांबेला नुकताच स्टार्स आशियाई फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. लॉस एंजेलिसमधल्या डाऊनटाऊनमध्ये झालेल्या या सोहळ्यात स्मिता तांबेला ‘जोरम’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार एका कोरियन अभिनेत्रीसोबत स्मिताला विभागून देण्यात आला.
हा पुरस्कार पटकल्यानंतर स्मिताने, ‘एका कोरिअन चित्रपटातील अभिनेत्रीला आणि मला असा विभागून ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ हा पुरस्कार देण्यात आला. सुंदर हिऱ्यांनी सजलेलं ते मानचिन्ह स्वीकारताना खूप खास वाटत होतं. जागतिक स्तरावर आमचा सिनेमा दाखवणं ही अभिमानाची बाब आहे.’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
स्मिताचं सध्या चाहत्यांकडून अभिनंदन आणि कौतुक होत आहे. ‘जोरम’ हा चित्रपट ८ डिसेंबरला जगभर प्रदर्शित होणार आहे.
अभिनंदन स्मिता! आम्हाला तुझा अभिमान आहे…
मुंबईतील बीकेसी येथे उभारण्यात आलेल्या नीता अंबानी कल्चरल सेंटरला नुकताच एक वर्ष पूर्ण झाले आहे.…
सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेल्या जान्हवी कपूरने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना सोमवारची सकाळची ट्रीट दिली…
The loneliness does not stop.It begins with the first splash of cold water on my…
सध्या सर्वत्र लगीनघाई सुरू असलेली पाहायला मिळत आहे. सर्वत्र लग्नाचे वारे वाहत असतानाच हळदी समारंभात…
“कोई अपना हाथ-पैर दान करता है भला, फिर अपना बच्चा अपने जिगर का टुकड़ा. नमिता…
न्यूली वेड पुलकित सम्राट और कृति खरबंदा की शादी को एक महीना हो चुका है.…