Marathi

सोनम कपूरने परिधान केली आईची ३५ वर्ष जुनी साडी, फोटो होतायत व्हायरल (Sonam Kapoor wears her mother’s 35 year old Gharchola saree, look goes viral)

सोनम कपूर अभिनय आणि चित्रपटांपेक्षा तिच्या फॅशन आणि स्टाईल सेन्ससाठी जास्त चर्चेत असते. तिला बॉलिवूडची फॅशन आयकॉन म्हटले जाते. मेक-अप, दागिने, हेअरस्टाईलपासून तिच्या पोशाखापर्यंत सर्व काही अगदी योग्य असते. तिच्या वॉर्डरोबमध्ये पोशाखांपासून ते विंटेज दागिन्यांपर्यंतचे जबरदस्त कलेक्शन आहे, जे ती अनेक प्रसंगी दाखवते. पुन्हा एकदा सोनम तिच्या लूकसाठी चर्चेत आली आहे आणि याचे कारण खूप खास आहे.

अलीकडेच सोनम कपूरने तिची जवळची मैत्रीण अपेक्षा मेकरच्या लग्नाच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती, जिथे ती गुजराती लूकमध्ये दिसली होती. लाल रंगाची गुजराती बांधणीची साडी लाल रंगाचा नक्षीदार ब्लाउज, केसात गजरा, डोळ्यात काजळ, भरजरी दागिने घालून सोनम पारंपारिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती तिचा हा साधा लुक देखील फॅशन स्टेटमेंट बनला. जेव्हा पापाराझीने सोनम कपूरला या लूकमध्ये कैद केले तेव्हा तिचा क्लासी लूक व्हायरल झाला.

आता सोनम कपूरने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर साडीचे फोटो शेअर केले आहेत. तिने असेही सांगितले की ही साडी तिच्यासाठी खूप खास आहे, कारण ती तिची आई सुनीता कपूरची 35 वर्षे जुनी साडी आहे. सोनमच्या या पोस्टनंतर तिचा साडीचा लूक आणखीनच चर्चेत आला आहे.

फोटो शेअर करताना सोनमने लिहिले की, “मी माझ्या आईची 35 वर्ष जुनी बांधणीची साडी नेसले. मला ही साडी आणि ब्लाउज उधार दिल्याबद्दल मम्मा धन्यवाद. मला तुझ्या वॉर्डरोबमधला लाल रंग घालायला आवडतो.” यासोबतच सोनमने चाहत्यांना विचारले की, “घरचोळा म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? कमेंट करून सांगा.”

सोनमच्या या लूकवर चाहत्यांची खुशी व्यक्त केली. त्यांना तिची स्टाइल खूप आवडली आहे. फॅन्स कमेंट करून घरचोळ्याच्या साडीबद्दल अनेक गोष्टी शेअर करत आहेत. घरचोळा ही गुजराती पारंपारिक साडी आहे, जी सासू आपल्या सुनेला देते. याचा अर्थ गृहप्रवेश असतो.

Akanksha Talekar

Recent Posts

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025

कहानी- वो लड़की कम हंसती है… (Short Story- Who Ladki Kam Hasti Hai…)

नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…

July 3, 2025

आपके मोबाइल की बैटरी की सबसे ज़्यादा खपत करते हैं ये ऐप्स (These Apps Drain Your Phone’s Battery the Most)

आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…

July 2, 2025
© Merisaheli