Marathi

नात्यात जरूर बोला हे लाडिक खोटं (Speak Lie With Love To Retain Healthy Relationship)

नात्यातील प्रेम टिकून ठेवण्यासाठी कधी कधी प्रेमळ खोटं बोलावं लागलं तर त्यात काहीच गैर नाही. प्रेमात आणि युद्धात काहीही चालतं म्हणतात ते असं… खोटं बोलतानाही ते अतिशय समंजसपणाने आणि विचारपूर्वक बोललं पाहिजे. अर्थात त्यातून आपला हेतू साध्य व्हावयास हवा शिवाय कोणीही दुखावता कामा नये.
नात्यामध्ये खरेपणा, प्रामाणिकपणा असला की नातं अधिक टिकतं. ते विश्‍वसनीय होतं, हे अगदी शंभर टक्के खरं असलं तरी कधी कधी खरं बोलणं कटू वाटू शकतं. तेव्हा नात्यातील प्रेम टिकून ठेवण्यासाठी कधी कधी प्रेमळ खोटं बोलावं लागलं तर त्यात काहीच गैर नाही. प्रेमात आणि युद्धात काहीही चालतं म्हणतात ते असं… खोटं बोलतानाही ते अतिशय समंजसपणाने आणि विचारपूर्वक बोललं पाहिजे. अर्थात त्यातून आपला हेतू साध्य व्हावयास हवा शिवाय कोणीही दुखावता कामा नये. बघुया प्रेम वाढविण्यासाठी काय काय खोटं बोलावं लागतं ते?

प्रत्येक नवर्‍याने आपल्या बायकोस, आज तू खूप सुंदर दिसत आहेस असं म्हटलं पाहिजे. अधुनमधून असं बोलल्यानं त्यांना फार बरं वाटतं.

फोनवर बोलताना तुमचा आवाज अतिशय सेक्सी वाटतो, असं पत्नीने पतीस सांगितल्यास त्यालाही छान वाटतं.

पती-पत्नी दोघांनीही एकमेकांना एखाद्या दिवशी, हा रंग तुझ्यावर खूप खुलून दिसतोय असं म्हटलं पाहिजे. मग तो रंग तुमच्या आवडीचा असणं गरजेचं नाही. अशा गोष्टीमुळे तुम्ही अधिक जवळ येता.

तुझ्या हाताला खरंच छान चव आहे आणि आजचं जेवणंही अगदी स्वादिष्ट झालं आहे, अशी प्रशंसा केलेली बायकांना खूप आवडते. आपण आपल्या पतीसाठीखास व्यक्ती आहोत, त्यांना आपली कदर आहे असं तिला वाटतं आणि ती आनंदी होते.

तू किती कष्ट करतेस. मग पत्नीने भलेही तसं केलेलं नसलं तरी तुम्ही असं बोलल्याने तिची हिंमत वाढते.

तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि तुम्ही मला जो सन्मान देता, त्यामुळे माझ्या जीवनातील तुमचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. असं बोलल्यानंतर खरोखरंच तुमच्या पतीचं तुमच्यावरील प्रेम वाढेल. आदर वाढेल.

वयाप्रमाणे केस पांढरे झाले तरी तुम्हाला पांढरे केसही सुंदर दिसतात, असं बोलून बघा. केसांचा रंग जरी उडाला, तरी तुमच्या संसारातील गोडवा यामुळे कायम राहण्यास मदत होईल.

तू आपलं घर, नाती खूप चांगल्या तर्‍हेने सांभाळतेस. या घराला तु अतिशय प्रेमाने व आपुलकीने बांधून ठेवलेलं आहेस. असं बोलल्यानंतर पत्नी देखील घरातील सदस्यांव्यतिरिक्त तुमच्या इतर नातेवाईकांशी देखील आपुलकीने वागताना दिसेल.

पती जर तुम्हाला मदत करू इच्छित असेल तर त्याला तसे करू द्यावे. कारण मदत करताना त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव असल्याचं कळतं. तेव्हा त्यांच्या जबाबदारी वाटून घेण्याच्या इच्छेची प्रशंसा करा. त्यातून त्यांचा हुरुप वाढेल.

मुलं म्हणतात, की पप्पा खूप चांगल्या पद्धतीने आमचा अभ्यास घेतात. आम्हाला शिकवणीला जाण्याची गरज नाही. असं बोलल्यास पप्पा मुलांच्या अभ्यासाबाबत अधिक जबाबदार होतात. आणि त्यांच्या अभ्यासाकडे गंभीरपणे लक्ष देतात. त्यामुळे तुमचा भार कमी होण्यास मदत होते.

तुम्ही बाजारातून जेव्हा भाजी आणता, ती ताजी असते. आणि स्वस्तही असते. तुम्हाला मार्केटींगचं अधिक चांगलं जमतं. असं बोलून बघा तुम्ही न सांगताही ते दररोज संध्याकाळी घरी येताना भाजी आणत जातील.

अशाप्रकारे दररोजच्या व्यवहारात तुम्ही एकमेकांशी सामंजस्याने वागून आपलं इच्छित साध्य करू शकता. यामुळे कोणीही दुखावलं जाणार नाही. उलट नात्यातील प्रेम वाढेल.

majhisaheli

Share
Published by
majhisaheli

Recent Posts

कहानी- कंकाल (Short Story- Kankal)

सुषमा मुनीन्द्र कई कुरूप हुए हैं, जिन्होंने अपने क्षेत्र में नाम कमाया. इतना नाम कमाया…

February 8, 2025

Jewel Chief

Mix contemporary style with chic, desi looks and you’ll soon have heads turning in awe!…

February 8, 2025
© Merisaheli