Entertainment Marathi

सुकेश चंद्रने जॅकलिनला व्हॅलेंटाइन डे निमित्त दिलं प्रायव्हेट जेट (Sukesh Chandrashekhar gifts customised private jet to Jacqueline Fernandez on Valentines’s Day)

२०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गेल्या अनेक महिन्यांपासून तुरुंगात असलेला सुकेश चंद्रशेखर अनेकदा तुरुंगातून जॅकलीन फर्नांडिसवर प्रेमाचा वर्षाव करतो. त्याने आतापर्यंत तुरुंगातून जॅकलीनला अनेक पत्रे लिहिली आहेत आणि प्रत्येक पत्रात तो दावा करतो की तो अभिनेत्रीवर किती प्रेम करतो. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सुकेशने पुन्हा एकदा जॅकलीनवर प्रेमाचा वर्षाव केला आहे आणि तिला एक खाजगी जेट देखील भेट दिले आहे

सुकेशने तुरुंगातून जॅकलीनला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि तुरुंगातून पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जॅकलिनला आधीच अनेक महागड्या भेटवस्तू देणाऱ्या सुकेशने व्हॅलेंटाईन डेला तिला एक खाजगी जेट भेट दिले आहे.

यासोबतच सुकेशने जॅकलीनला एक प्रेमपत्रही लिहिले आहे आणि तिचा प्रवास सोपा करण्यासाठी त्याने तिला एक जेट भेट दिल्याचे सांगितले आहे. सुकेशने पत्रात लिहिले, “बाळा, तू तुझ्या कामासाठी आणि शूटिंगसाठी जगभर प्रवास करतेस. आता या जेटमुळे तुझा प्रवास खूप सोपा होईल. या व्हॅलेंटाईन डे वर, माझी फक्त एकच इच्छा आहे की जर मी पुन्हा जन्मलो तर मी तुझे हृदय बनू इच्छितो जेणेकरून मी तुझ्या आत धडधडत राहू शकेन. मी या जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे कारण माझ्याकडे तुझ्यासारखी सुंदर व्यक्ती आहे.”

यासोबतच सुकेशने सांगितले आहे की हे पूर्णपणे कस्टमाइज्ड प्रायव्हेट जेट आहे. या खाजगी जेटचे नाव जॅकलिनच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून (JF) ठेवण्यात आले आहे आणि त्याचा नोंदणी क्रमांक जॅकलिनच्या जन्म महिन्यावरून घेण्यात आला आहे.

सुकेश याआधीही जॅकलीनला पत्र लिहित आहे. तो म्हणतो की जॅकलिन त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि दोघेही लग्न करणार होते. जॅकलिनने सुकेशच्या या पत्रांवर अनेक वेळा आक्षेप व्यक्त केला आहे. ती म्हणती की ही पत्रे तिची प्रतिमा खराब करतात. तिने तिच्या वकिलामार्फत या पत्रांवर बंदी घालण्याची विनंतीही केली आहे.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025

कहानी- वो लड़की कम हंसती है… (Short Story- Who Ladki Kam Hasti Hai…)

नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…

July 3, 2025

आपके मोबाइल की बैटरी की सबसे ज़्यादा खपत करते हैं ये ऐप्स (These Apps Drain Your Phone’s Battery the Most)

आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…

July 2, 2025
© Merisaheli