Marathi

वाढत्या टोमॅटोंच्या किंमतीमुळे सुनीश शेट्टीसुद्धा हैराण, म्हणाला सेलिब्रेटी असलो तरी फटका आम्हालाही बसतो ( Suniel Shetty Is Also Bothered By Rising Tomato Prices Like Commom Men )

टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्याच खिशाला फटका बसला नसून, बॉलिवूड स्टार सुनील शेट्टीही टोमॅटोच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या किमतीमुळे प्रचंड नाराज आहेत. त्याच्या ताज्या मुलाखतीत, अभिनेत्याने सांगितले की तो देखील एक रेस्टॉरंट मालक आहे आणि वाढत्या किमतीमुळे त्याला टोमॅटोची गुणवत्ता आणि चव यांच्याशी तडजोड करावी लागत आहे.

Aaj Tak शी संवाद साधताना, अभिनेता सुनील शेट्टीने टोमॅटोच्या वाढत्या किमती आणि त्याच्या खंडाळा फार्म हाऊसमध्ये पिकवलेल्या अनेक फळे आणि भाज्यांबद्दल सांगितले.

टोमॅटोच्या किमतीबद्दल बोलताना सुनील शेट्टी म्हणाला- माझी पत्नी माना एक-दोन दिवसांसाठीच फळे आणि भाज्या खरेदी करते. आम्ही ताजे पदार्थ खाण्यावर विश्वास ठेवतो. पण आजकाल टोमॅटोचे भाव गगनाला भिडला आहे आणि सर्वसामान्यांप्रमाणेच आमच्या स्वयंपाकघरावरही याचा परिणाम झाला आहे.

आजकाल आपण टोमॅटो खूप कमी खातो. लोकांना वाटेल की मी सुपरस्टार आहे आणि अशा गोष्टींचा माझ्यावर परिणाम होणार नाही, पण हे खरे नाही. आम्हालाही अशा समस्यांनासामोरे जावे लागते.

अभिनेत्याने असेही सांगितले की लोकांना वाटते की स्टार्सना या घरगुती गोष्टींबद्दल काहीही माहिती नसते, परंतु कधीकधी स्टार्स सामान्य लोकांपेक्षा जास्त जागरूक असतात – मी पण एका रेस्टॉरंटचा मालक आहे. मी नेहमीच सर्वोत्तम किंमतीसाठी सौदेबाजी केली आहे. मात्र टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळे मला ग्राहकांची चव आणि पदार्थाच्या दर्जाबाबत तडजोड करावी लागत आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कविता- चुनौतियां (Poetry- Chunautiyan)

 आवश्यक है कि हम अपने लिए खड़ी करते रहें नियमित कुछ चुनौतियां स्वयं को  मशीन…

April 29, 2024

‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचा मान संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ला (Sanju Rathod Trending Marathi Song Gulabi Sadi Featured On New York Times Square)

गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने संजूच्या करिअरची सुरुवात झाली. ‘बाप्पावाला गाणं’ हे त्याचं पहिलं गाणं सोशल मीडियावर…

April 29, 2024

पंजाबमध्ये गेल्यावर आमिर खानला समजली नमस्तेची ताकद, म्हणाला मी मुस्लिम असल्यामुळे मला… (  Aamir Khan recalls learning the power of folded hands, Says – Understood power of Namaste while shooting in Punjab)

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या अभिनयाने तसेच वागण्याने लोकांची मने जिंकतो. तो आपल्या भावना अत्यंत…

April 29, 2024

पति की राशि से जानिए उनका स्वभाव, इन राशिवाले होते हैं बेस्ट पति (Zodiac Signs That Make Best Husbands, Men With These Signs Proves Loving Partner)

आखिर आपकी जिंदगी का सबसे खास शख़्स यानि आपका जीवनसाथी कैसा होगा, यह एक ऐसा…

April 29, 2024

त्या पहिल्या भेटीत… (Short Story: Tya Pahilya Bhetit)

मनोहर मंडवालेकुणाच्या तरी धक्क्यानं अभय भानावर आला. एवढ्या गर्दीतही त्याच्या डोळ्यांसमोरील त्या अनामिकेची धुंदी काही…

April 29, 2024
© Merisaheli