‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीव्ही शोमध्ये सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिधवानी हिने नुकताच तिचा २६ वा वाढदिवस साजरा झाला. तिने आपल्या वाढदिवसाला स्वत:ला एक आलिशान कार गिफ्ट केली. स्वतःच्या पैशांनी ही कार घेऊन, आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्यामुळे ती फार खुश आहे.
पलक सिधवानीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती कार घेण्यासाठी शोरूममध्ये जाताना दिसत आहे.
कार खरेदी करण्यासाठी पलक सिंधवानी तिच्या आई-वडिलांसोबत शोरूममध्ये गेली होती. तिने त्यांनी छोटी पूजा केली आणि केक कापून नवीन कार खरेदी केल्याचा आनंद साजरा केला. पलकची ही दुसरी कार आहे.
याआधी २०२१ मध्ये तिने एक कार खरेदी केली होती. ती तिने तिच्या वडिलांना वाढदिवशी भेट दिलेली. तेव्हा पलकने भावूक पोस्ट शेअर करत सांगितले होते की, ही कार फारशी महाग नाही, पण माझ्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे मला खूप आनंद झाला. कारण ही आमच्या कुटुंबातील पहिली कार होती.
महाग नाही, पण कार खास आहे
आता पलक सिधवानीने तिच्या २६व्या वाढदिवसाला दुसरी कार खरेदी केली आहे. पलकने या कारची किंमत जाहीर केली नाही, पण ती महाग नसून बजेटमध्ये असल्याचे सांगितले. व्हिडिओमध्ये पलकने असेही सांगितले की, आईला रुफटॉप कार हवी आहे आणि वडिलांना मोठी कार हवी आहे.
मला आणि माझ्या भावाला आमच्या आई-वडिलांचे सुख हवे होते. त्यामुळे आई-वडिलांची इच्छा पूर्ण केल्याचा आम्हाला खूप आनंद झाला. ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी देवाने पाठबळ दिले म्हणून तिने देवाचे आभार देखील मानले.
कैटरीना कैफ और विक्की कौशल हर त्योहार पूरे जोश, प्यार और उमंग-उत्साह के साथ मनाते…
होली रंगों का त्योहार है, जो हंसी-ख़ुशी और मस्ती से भरा होता है. लेकिन ये…
“राधिकाजी, आपको और सुननेवालों को नमस्कार! आज यहां आकर एक बहुत बड़ा सपना पूरा हो…
अपनी अपकमिंग फिल्म बी हैप्पी (Be Happy) के प्रमोशन के दौरान अभिषेक बच्चन ने इस…
देशभर में होली (Holi) का त्योहार धूमधाम से मनाया जा रहा है. आम आदमी की…
Does the phrase ‘butterflies-in-my-stomach’ remind you of those breezy times that you spent with your…