Marathi

तेजश्री प्रधानचा ‘ओली की सुकी’ चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर (Tejashree Pradhans ‘Oli Suki’ Movie On Ott)

प्रत्येक नवा दिवस आपल्यासोबत एक नवीन संधी घेऊन येतो, अशाच एका प्रेरणादायी विषयावर आधारित ‘ओली की सुकी’ चित्रपट ४ जानेवारी २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ‘आनंद दिलीप गोखले’ यांनी केले असून चित्रपटात तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले, शर्वरी लोहकरे, संजय खापरे, सुहास शिरसाट आणि वर्षा उसगांवकर हे सुप्रसिद्ध अभिनेते दिसणार आहेत.

चित्रपटाची कथा झोपडपट्टी आणि त्यातील आयुष्यात भरकटलेल्या मुलांभोवती फिरते. झोपडपट्टीतील टुकार मुलांच्या दोन गटांत नेहमी विनाकारण भांडणे होत राहतात. ही मुले वाईट वळणांच्या एवढ्या अधीन जातात की चोरी करण्यापर्यंत यांचे विचार पोहचतात. पण त्याचवेळी त्यांच्या आयुष्यात राधिकाताई येते, जी त्यांच्या संपूर्ण जीवनाला एक वेगळंच वळण देते. राधिकाताईने नेमकी अशी कोणती जादू या मुलांवर केली ते चित्रपटात पहायला मिळणार आहे.

आयुष्यात अनेक अडचणी येतात पण आपण त्यांना सामोरे जाऊन यशाच्या दिशेने अविरत चालत रहायला हवं. अशा आशयाचा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

व्यंग्य- मैं अवसाद हूं… (Satire- Main Avsad Hoon…)

सूजी और पथराई आंखें, उपले सा चेहरा, एक्स्प्रेशन का अभाव… ये पहचान है अवसादग्रस्त इंसान…

May 9, 2024

अभिनेत्री शिवानी सुर्वेचं तब्बल ९ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन (Shivani Surve Comeback On Star Pravah After Nine Years Thod Tuz Ani Thod Maz Serial)

‘देवयानी’ मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शिवानी सुर्वे आता नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला…

May 9, 2024

आयएमडीबीने जाहीर केलेल्या सर्वांत लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीत फुल कुमारी अर्थात नितांशी गोयलने मारली बाजी (Lapataa Ladies Actress Nitanshi Goel Aka Phool Kumari Becomes Most Popular Indian Celebrity On Imdb)

किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' या चित्रपटात फुल कुमारीची भूमिका साकारून अभिनेत्री नितांशी गोयलने प्रेक्षकांच्या…

May 9, 2024
© Merisaheli