हिंदी चित्रपटसृष्टीत एक काळ असा होता जेव्हा अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित ही सुपरहिट जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती. त्यावेळी अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी ज्या कोणत्याही चित्रपटात काम केले ते सुपरहिट ठरायचे, पण नंतर अचानक त्यांच्यात असे काही घडले की, या सुपरहिट ऑन-स्क्रीन कपलचे ब्रेकअप झाले आणि अनेक वर्षे हे स्टार्स एकत्र दिसलेच नाहीत. अखेर, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी वर्षानुवर्षे एकत्र का काम केले नाही याचे कारण आता समोर आले आहे.
अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित या हिट जोडीने ‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘पुकार’ आणि ‘बेटा’ सारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. असं म्हटलं जातं की, त्या काळात ही जोडी बॉक्स ऑफिसवर तर धुमाकूळ घालत होतीच, पण खऱ्या आयुष्यातही दोघांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम वाढू लागलं होतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर आणि पडद्यावर रोमान्स केल्यानंतर अनिल कपूर खऱ्या आयुष्यात माधुरी दीक्षितच्या प्रेमात पडले होते, तर माधुरी दीक्षितही त्यांना पसंत करू लागली होती, परंतु त्यांचे नाते पुढे जाण्यापूर्वीच अनिलची पत्नी सुनीता यांना जाणीव आहे.
माधुरी आणि अनिलबद्दल कळल्यानंतर सुनीताने आपलं नातं वाचवण्यासाठी जे केलं, त्याची कदाचित अनिलनेही कल्पना केली नसेल. असे म्हटले जाते की, एकदा अनिल आणि माधुरी ‘पुकार’ चित्रपटाचे शूटिंग करत असताना सुनीता आपल्या मुलांसह चित्रपटाच्या सेटवर पोहोचली होती. सेटवर पोहोचल्यानंतर सुनीताने तेथे कोणतेही नाटक केले नाही, परंतु तिला तेथे मुलांसोबत पाहून प्रकरणाचे गांभीर्य समजले.
सेटवर पत्नी आणि मुलांना पाहिल्यानंतर त्यांनी माधुरी दीक्षितसोबत पुन्हा काम करणार नाही, असा निर्णय घेतला. या निर्णयानंतर या जोडीने 18 वर्षे एकाही चित्रपटात काम केले नाही आणि तब्बल 18 वर्षानंतर ही जोडी 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डबल धमाल’ चित्रपटात दिसली.
60 और 70 के दशक के पॉपुलर एक्टर जूनियर महमूद (Junior Mehmood) इस वक्त पेट…
चित्रपट निर्मात्या झोया अख्तरचा बहुप्रतिक्षित चित्रपट द आर्चीजचा भव्य प्रीमियर मुंबईत झाला. प्रीमियरला संपूर्ण बॉलीवूडने…
ऋतिक रोशन अपनी लवलेडी के संग ज़ोया अख्तर की फिल्म द आर्चीज के प्रीमियर पर…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण हे संपूर्ण भारतासाठी प्रचंड शोकाचे होते. त्यांच्या निधनाने लाखों लोकांच्या हृदयात…
'फायटर' चित्रपटातील, 'ग्रूप कॅप्टन राकेश जय सिंग'च्या भूमिकेतील अनिल कपूरच्या लूकची झलक समोर आली आहे.…
अभिनेता रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘ॲनिमल’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतोय.…