स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या तिसऱ्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. छोट्या उस्तादांनी आपल्या भारावून टाकणाऱ्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या छोट्या उस्तादांमधून ६ सर्वोत्तम स्पर्धकांनी आता गाठली आहे महाअंतिम फेरी. अप्रतिम गाणी सादर करुन प्रेक्षकांची मन जिंकलेल्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा ९ आणि १० नोव्हेंबरला पाहायला मिळणार आहे.
पुण्याचा देवांश भाटे आणि स्वरा किंबहुने, अहमदनगरचा सारंग भालके, यवतमाळची गीत बागडे आणि विरारच्या पलाक्षी दीक्षित आणि जुई चव्हाण या सहा जणांमध्ये महाअंतिम लढत रंगणार आहे. त्यामुळे सुपरस्टार होण्याचा मान कोण पटकवणार याची उत्सुकता वाढली आहे. छोट्या उस्तादांना या पर्वात मोलाचं मार्गदर्शन केलं ते सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर, लोकप्रिय़ गायिका वैशाली सामंत, तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे आणि सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अविनाश-विश्वजीत यांनी. या संगीत महारथींच्या सानिध्यात छोट्या उस्तादांवर गाण्याचे संस्कार झालेत त्यामुळे त्यांची पुढील वाटचाल दैदीप्यमान असणार यात शंका नाही.
महाअंतिम सोहळ्यात छोटया उस्तादांना साथ देण्यासाठी अभिजीत सावंत, रोहित राऊत, जुईली जोगळेकर, राधा खुडे खास हजेरी लावणार आहेत. सिद्धार्थ जाधव देखिल या महाअंतिम सोहळ्यात धिंगाणा घालणार आहे. टॉप ६ स्पर्धकांमध्ये सुरांची महाजुगलबंदी देखिल रंगणार आहे. यासोबतच स्टार प्रवाहच्या परिवाराच्या उपस्थितीत सोहळ्याची रंगत द्विगुणीत होणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३ चा महाअंतिम सोहळा येत्या ९ आणि १० नोव्हेंबरला रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में दयाबेन का मुख्य किरदार निभाने वाली दिशा…
रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…
देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) इन दिनों स्पिरिचुअल जर्नी पर हैं और पति शाहनवाज़ (Shanwaz Shaikh)…
नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…
'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) स्टार रोहित पुरोहित (Rohit Purohit)…
आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…