Entertainment

टीव्हीवरील या तरुण कलाकारांनी कमी वयातच घेतले स्वत:चे घर, पाहा कोण आहेत हे कलाकार (These Young TV Stars are Owners of Their Own House, Some at the Age of 15 and Some at the Age of 17 Bought Their Dream Home)

प्रेक्षकांमध्ये टीव्ही कलाकारांची लोकप्रियता बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा कमी नाही. विशेषत: टीव्हीचे अनेक तरुण कलाकार छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कलाकारांना टक्कर तर देत आहेतच, पण नाव आणि प्रसिद्धीच्या बाबतीतही त्यांची शर्यत सुरु आहे. तरुण वयात नाव आणि प्रसिद्धी मिळवणारे अनेक स्टार्सही स्वतःच्या घराचे मालक बनले आहेत. टीव्हीवर अनेक बालकलाकार आहेत, त्यातील काहींनी वयाच्या 15 व्या वर्षी तर काहींनी वयाच्या 17व्या वर्षी घर विकत घेतले आहे. या यादीत सिद्धार्थ निगम ते रुहानिका धवन यांसारख्या तरुण स्टार्सच्या नावांचा समावेश आहे, एक नजर टाकूया.

सिद्धार्थ निगम

‘चक्रवर्ती अशोक सम्राट’ या मालिकेतून नाव आणि प्रसिद्धी मिळवणारा २२ वर्षीय तरुण अभिनेता सिद्धार्थ निगमने नुकतेच मुंबईत नवीन घर घेतले आहे. या नवीन घराचे त्याने स्वप्नातील घर असे वर्णन केले आहे. याआधीही 2020 मध्ये सिद्धार्थने घर विकत घेतले होते.

रुहानिका धवन

‘ये है मोहब्बतें’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेत दिसलेली रुहानिका धवन सध्या 15 वर्षांची आहे, पण ती तिच्या स्वप्नातील घराची मालकीण आहे. रुहानिकाने या वर्षी जानेवारी महिन्यात मुंबईत स्वतःचे एक आलिशान घर घेतले आहे.

आशी सिंग

‘ये उन दिनों की बात है’ या टीव्ही मालिकेमध्ये काम करणारी आशी सिंह 25 वर्षांची आहे, पण वयाच्या 23 व्या वर्षी ती तिच्या ड्रीम होमची मालक बनली. आशीने 2021 मध्ये घर खरेदी केले होते, आणि ते घर तिने आपल्या आईला भेट दिले.

अश्नूर कौर

टीव्हीची तरुण अभिनेत्री अश्नूर कौरने लहान वयातच खूप प्रसिद्धी मिळवली आहे. 19 वर्षीय अश्नूरने 2021 मध्ये तिचे स्वप्नातील घर विकत घेतले होते. अश्नूर तिच्या घराची मालकिण आहे.

अवनीत कौर

‘अलादीन: नाम तो सुना ही होगा’ सारख्या मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री अवनीत कौर 21 वर्षांची झाली आहे, पण तिने वयाच्या 17 व्या वर्षी स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. अभिनेत्रीने 2019 मध्ये एक आलिशान घर खरेदी केले होते.

जन्नत जुबेर रहमानी

‘फुलवा’ या मालिकेतून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री जन्नत जुबैर रहमानी 21 वर्षांची आहे आणि तिने गेल्या वर्षीच सोशल मीडियावर स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले असल्याचे सांगितले होते. अभिनेत्रीने काही काळापूर्वी तिचे स्वप्नातील घर विकत घेतले होते.

सुंबुल तौकीर

‘इमली’सारख्या शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सुंबूल तौकीर आज 19 वर्षांची झाली आहे. ती अलीकडे ‘बिग बॉस 16’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. सुंबुलने नुकतेच मुंबईत आपले स्वप्नातील घर विकत घेतले आहे.

majhisaheli

Share
Published by
majhisaheli

Recent Posts

‘मेनोपॉजला घाबरू नका’ – अभिनेत्री लारा दत्ताचा महिलांना सल्ला : केली सहभागात्मक संवादाची सुरुवात (“Don’t Be Scared”- Actress Lara Dutta’s Advice To Women In Empowering Menopause Conversations)

“आमच्या घराण्यात महिलांचं साम्राज्य आहे. माझ्या सर्व बहिणींना कन्यारत्ने झाली आहेत. त्यामुळे मासिक पाळी अथवा…

December 8, 2023

कहानी- पहला पहला प्यार था… (Short Story- Pahla Pahla Pyar Tha…)

"… निष्ठा, यह हमारा स्कूल का आख़िरी साल है. ये दिन लौट कर नहीं आएंगे.…

December 8, 2023

लीक माय शू या अॅनिमल सिनेमातील संवादाची बरीच चर्चा, तृप्ती डिमरीने सोडले मौन (Tripti Dimri Reacts To Animal’s Controversial Scene ‘Lick My Shoe’ With  Ranbir Kapoor)

अॅनिमल हा चित्रपट सध्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. रणबीर कपूरपासून बॉबी देओलच्या अभिनयापर्यंत, तसेच तृप्ती…

December 8, 2023
© Merisaheli