Marathi

ठिपक्यांची रांगोळी फेम अतुल तोडणकर यांना झालेला ब्रेन हॅमरेज, बाप्पाच्या कृपने सर्व काही निभवलं ( Thipkyanchi Rangoli Fame Atul Todankar was diagnosed with brain haemorrhage)

बरेचदा आपल्या आजारपणाची योग्य आणि उत्तम ट्रीटमेंट कुठे मिळेल हे माहित नसतं आणि एकदा का वेळ निघून गेली की आपल्या हाती काहीही उरत नाही, म्हणून हा पोस्ट प्रपंच.. माझे दोन वाढदिवस आहेत. एक जन्मदिवस आणि दुसरा पुनर्जन्म दिवस.. नाटक – मालिका – सिनेमा या तीनही क्षेत्रात उत्तम काम चालू होतं.. आणि अचानक 21 जानेवारी 2024 ला ” एका लग्नाची पुढची गोष्ट ” या नाटकाच्या पुण्याच्या प्रयोगादरम्यान मला शारीरिक अस्वासाथ्याला सामोरं जावं लागलं, ब्रेन हॅमरेज झालं..सगळं थांबलं आणि जवळपास सगळं संपल्याची जाणीव झाली.

परमेश्वराची कृपा, आईवडील, बायको- मुलगा, सर्व रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे आणि योग्य वेळेत मिळालेल्या उपचारामुळे यातून ठणठणीत बरा झालो.पण त्याकरता 6-7 महिने पूर्ण आराम आणि उपचार घ्यावे लागले आणि सर्वात महत्वाचे…सर्वोत्तम उपचार मिळाले. प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट, सातारा येथील डॉ. सुयोग दांडेकर यांचा अमूल्य सल्ला आणि उपचार हा या प्रवासातला सर्वात महत्वाचा टप्पा..

आमच्या चंदेरी दुनियेत काम करताना अवेळी जेवण, कामाच्या मोकाट वेळा, अपुरी झोप व आराम यामुळे तुमची शरीर प्रकृती आतून पोखरत जाते आणि असा अचानक विस्फोट होतो जो दुर्दैवाने माझ्या बाबतीत झाला. पण त्यातली सुखावह गोष्ट म्हणजे डॉ सुयोग दांडेकरांचा उपचार. आम्ही सगळेच कलावंत आपापली काळजी घेत असतोच. जिम, योगा, मेडिटेशन, स्किन आणि केसांची काळजी घेत असतोच पण अंतर्गत शरीर स्वच्छता करायचं विसरतो आणि नेमकं हेच कार्य डॉ दांडेकर यांच्या प्रकृती रिसॉर्ट मध्ये होतं. मी 7 दिवसात माझ्या शरीराची अंतर्गत स्वच्छता करून आलो. आणि माझी प्रकृती कमालीची सुधारलीय..

वर्षातून किमान 7 दिवस तरी स्वतःच्या तब्येतीसाठी द्यायचेच आणि आपली शरीररूपी गाडी सर्विस करून घ्यायची, हे ठरलंय 😍. माझ्या सर्व स्नेही, कलाकार मित्रमंडळी या सर्वांना मला आवाहन करावेसे वाटते की वर्षातून एकदा आपल्या तब्येतीसाठी प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट ला जाऊन या. एक पिकनिक स्वतःच्या प्रकृतीसाठी. बरं… हे अजिबात प्रमोशन नाहीय… स्वानुभव आहे..

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

मोडलं अब्दू रोझिकचं लग्न, स्वत:च दिली माहिती, हे आहे कारण (Bigg Boss 16 Fame Abdu Rozik Calls Off Wedding With Fiance)

बिग बॉस 16 सह घराघरात नाव कमावणारा स्पर्धक अब्दू रोजिकबद्दल एक दुःखद बातमी ऐकायला मिळत…

September 18, 2024

पितृ पक्ष २०२४ (Pitru Paksha 2024)

अनंत चतुर्दशी झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितृ पंधरवडा असतो. प्रतिपदा ते अमावस्या हा काळ…

September 18, 2024

मुलांचं शारीरिक आरोग्य (Children’s Physical Health)

मुलांचं आरोग्य चांगले राहावं याकरिता आपण त्यांच्या खाण्यापिण्याबाबत जास्त दक्ष राहतो. त्यांच्या पोषणाकडे दुर्लक्ष होणार…

September 18, 2024
© Merisaheli