Marathi

बिग बॉसचा आवाज देणाऱ्याला धमक्यांचे मेसेज, कुटुंबालाही धोका (Threatening messages to the Voice over Artist Of Bigg Boss Vijay Vikram Singh, threat to the family too)

बिग बॉसच्या भारदस्त आवाजाच्या सर्वचजण प्रेमात आहेत. अनेकांना हा आवाज कोणाचा याची उत्सुकता असते. आज आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती सांगणार आहोत.

तर बिग बॉस हा आवाज आहे विजय विक्रम सिंह यांचा. बिग बॉसच्या आवाजाची प्रचंड क्रेझ आहे. या खास आवाजामुळे लोक त्यांना विशेष मान देतात. आता बऱ्याच जणांना विजय यांची ओळख पटू लागली आहे. बिग बॉस म्हणून ते लोकप्रियही झाले आहेत.

विजय विक्रम सिंह यांनी अलीकडेच ‘बॉलिवूड बबल’शी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांत एका प्रसिद्ध स्पर्धकाला घरातून एलिमिनेट केल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला लोकांकडून धमक्यांचा सामना करावा लागला., ते शोमध्ये फक्त एक आवाज आहेत. ते स्पर्धकांशी संबंधित निर्णय घेत नाही.

विजय विक्रम सिंह म्हणाले, ‘मला लोकांना सांगायचे आहे की बिग बॉसमध्ये दोन आवाज आहेत, श्रोत्यांशी संवाद साधणारा आवाज माझा असतो. आपला आवाज वेळ सांगणारा आणि टीव्ही प्रेक्षकांना घटनांबद्दल माहिती देणारा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘स्पर्धकांशी संवाद साधणारा आवाज वेगळा आहे. मी लोकांना सांगत असतो की मी शोमधील निवेदकाचा आवाज देतो.

विजयने पुढे सांगितले की, गेल्या दोन वर्षांत, एका लोकप्रिय स्पर्धकाला काढून टाकल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. ‘गेल्या दोन वर्षांत, स्पर्धकांना काढून टाकण्यासाठी मला अनेक वेळा ऑनलाइन गैरवर्तनाचा सामना करावा लागला. मी त्यांना सांगत असतो की मी एलिमिनेशन करत नाही, ते लोकांच्या मतांद्वारे केले जाते. दुसरे म्हणजे , स्पर्धकांशी बोलताना येणारा आवाज माझा नाही. आपल्या कुटुंबीयांनाही धमक्या आल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘लोकांनी माझ्या कुटुंबालाही यात ओढले आणि धमक्या देण्यास सुरुवात केली.’

मी बिग बॉस नसून फक्त दुसरा आवाज आहे. बिग बॉसच्या पात्राला अजून कोणाचा आवाज आहे हे त्यांनी उघड केले नाही.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कद्दू के उपयोगी घरेलू नुस्ख़े (Useful home remedies of pumpkin)

कद्दू में विटामिन ए, सी व ई के साथ-साथ फाइबर, पोटैशियम, बीटा-कैरोटीन पाए जाते हैं,…

July 5, 2025

काजोल- यहां हर‌ फ़ैसला एक कुर्बानी है… (Kajol- Yahaan har faisla ek kurbani hai…)

- 'मां' एक माइथोलॉजिकल हॉरर मूवी है. इसमें मैं लोगों को इतना डराउंगी... इतना डराउंगी…

July 5, 2025

पुरुषों के इन हेल्थ सिग्नल्स को न करें नज़रअंदाज़ (Men’s health: Critical symptoms that should never be ignored)

पत्नी, बच्चों और घर के दूसरे सदस्यों के जरा-सा बीमार पड़ने पर अक्सर पुरुष तुरंत…

July 5, 2025

कहानी- वे दोनों‌ (Short Story- Ve Dono)

"बाकी जो समय बचेगा, उसमें हम दोनों पुराने दिनों के सहारे जी लिया करेंगे." "ठीक…

July 5, 2025
© Merisaheli