Uncategorized

ना जंगी पार्टी ना देखाऊपणा, तृप्ती डिमरीने कुटुंबियांसह खास बनवला आपला वाढदिवस ( Triptii Dimri aka Bhabhi 2 from Animal celebrates her birthday with family)

ॲनिमल या चित्रपटातून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री ​​तृप्ती डिमरी 30 वर्षांची झाली आहे. अभिनेत्रीने तिचा वाढदिवस तिच्या कुटुंबियांसोबत साजरा केला. ज्याची काही झलक दाखवून अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना सोशल मीडियावरुन दाखवली आहे.

तृप्तीने तिचा 30 वा वाढदिवस तिच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींसोबत साजरा केला.

तृप्तीने तिच्या इंस्टाग्रामवर या वाढदिवसाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये रुमची सुंदर सजावट स्पष्टपणे दिसत आहे,खोली पिवळ्या आणि पांढऱ्या फुग्यांनी सजवली आहे.

टेबलवर मुलांनी दिलेले फुलांचे गुच्छ आणि ग्रीटिंग कार्ड्स आहेत.

बेडशीटवर हॅपी बर्थडे लिहिलेले असते. भिंतीवर वाढदिवसाच्या शुभेच्छा असे बॅनरही आहे.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये कुटुंबातील सदस्य केक कापतानाचे आणि केक खायला भरवतानाचे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

या सुंदर क्षणांमध्ये अभिनेत्री तिच्या प्रिय माणसांसोबत मस्ती करताना दिसत आहे.

वाढदिवसाचे हे सुंदर क्षण शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे – वाढदिवसाचे हे सेलिब्रेशन नेहमीच लक्षात राहील. तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादाबद्दल धन्यवाद.

अभिनेत्रीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते आणि फॉलोअर्सही कमेंट करत आहेत आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.;.,

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

नाती टिकविण्यासाठी वेळ कसा काढाल? (How Do You Find Time To Maintain A Relationship?)

आजकालच्या जोडप्यांना एकमेकांसाठी वेळ नाही-फुरसत नाही. घर-ऑफिस, पोरंबाळं, त्यांचं संगोपन आणि घरातील रामरगाडा यांच्या कचाट्यात…

April 12, 2024

अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओप्लास्टी, आता प्रकृती स्थिर (Sayaji Shine Hospitalied, Actor Goes Angioplasty In Satara)

आपल्या खणखणीत अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.…

April 12, 2024

घरी आलेल्या पाहुण्यांच्याबाबतीत प्रकर्षाने पाळला जातो हा नियम, खान ब्रदर्सनी सांगितलं सत्य (No One go hungry from Salman Khan’s house, father Salim Khan has made these rules for the kitchen)

सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या दातृत्वाचे अनेक किस्से बरेचदा ऐकायला मिळतात. भाईजान…

April 12, 2024

महेश कोठारे यांनी केली ‘झपाटलेला ३’ची घोषणा (Director Mahesh Kothare Announces Zapatlela-3)

अभिनेते महेश कोठारे यांच्या संकल्पनेतून तयार झालेला 'झपाटलेला' हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. आता…

April 11, 2024
© Merisaheli