काही दिवसांपूर्वीच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्रीवेडिंग फंक्शन पार पडले. या सोहळ्याला जगभरातील दिग्गज व्यक्तींनी उपस्थिती लावलेली. हा दिमाखदार सोहळा अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सोहळ्याबाबत अभिनेत्री ट्विंकल खन्नाने नुकतेच आपलं मत व्यक्त केले.
टाइम्स ऑफ इंडिया दिलेल्या मुलाखतीत ट्विंकलने लिहिले की, मी माझ्या बहिणीला म्हणाले बरं झालं आपण आपली आडनावं बदलली नाहीत, लग्नानंतर आपण खन्नाच राहिलो. जर आपण आडनाव बदललं असतं तर पुन्हा खन्ना होण्यासाठी नवऱ्याकडून आपल्याला एनओसी घ्यावी लागली असती अंबानींच्या प्री-वेडिंग इव्हेंटनंतर, लेव्हल खूप वर सेट केली गेली आहे. अभिनेत्री म्हणाली की, मी नीता भाभींप्रमाणे नाचू शकत नाही.
ट्विंकलने पुढे लिहिले- ‘जेव्हा मी महामारीच्या काळात तम्मा तम्मा या गाण्यावर नाचण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी लगेच पडले, कदाचित देवालाही मी नाचायला नको होते. एवढेच नाही तर माझा पायही फ्रॅक्चर झाला. मी आणि माझा पती रात्री १० वाजेपर्यंत क्वचितच जागे राहतो. जेव्हा जेव्हा आम्हाला २० लोकांसाठी डिनर पार्टीचे आयोजन करावे लागते तेव्हा आम्ही खूप घाबरून जातो. जर माझ्या मुलांना खरोखर आनंदी व्हायचे असेल तर त्यांनी पळून जाऊन लग्न करणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे.
कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में दयाबेन का मुख्य किरदार निभाने वाली दिशा…
रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…
देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) इन दिनों स्पिरिचुअल जर्नी पर हैं और पति शाहनवाज़ (Shanwaz Shaikh)…
नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…
'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) स्टार रोहित पुरोहित (Rohit Purohit)…
आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…