Entertainment Marathi

ना कोणता सिनेमा ना कोणते गाणे तरी कोट्यवधींची कमाई कशी करतो ओरी ( What Is Orry’s Source Of Income, Explain In Bharti Singh Podcast)

ओरी त्याच्या प्रत्येक मुलाखतींमध्ये तो पैसे कसा कमावतो याबद्दल सांगतो मात्र तरीही लोकांना त्याच्या उत्पन्नाची उत्सुकता असतेच. काही दिवसांपूर्वीच ओरीने भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाच्या पॉडकास्टवर हजेरी लावली होती. तेव्हाही ओरीला हाच प्रश्न विचारण्यात आला होता.

ओरीने स्वतःबद्दल सर्व काही सांगितले. फोटो क्लिक करण्यासाठी तो किती पैसे घेतो याचाही खुलासा त्याने केला. यावेळी भारतीला आश्चर्य वाटले की कोणताही चित्रपट किंवा गाणेही न करता त्याने एका वर्षात एवढं स्टारडम मिळवलं तरी कसं?

भारतीने ओरीला विचारले, ‘तू महाग आहेस का?’ ओरीने उत्तर दिले, ‘मी स्वस्त दिसतो का?’ हर्षने ओरीला विचारले की एका फोटोसाठी किती पैसे घेतोस, तेव्हा त्याने २० लाख रुपये सांगितले. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर ओरीने सांगितले की, एखाद्या चाहत्यासोबत फोटो काढल्यास तो त्यांच्याकडून पैसे घेत नाही.

पण ओरीसोबत फोटो काढण्याची मागणी कोणी केली किंवा फोटो मागितला तर तो २० लाख रुपये घेतो. ओरी कोणत्याही शो किंवा कार्यक्रमात जाण्यासाठी २५ लाख रुपये आकारतो.

याआधी ओरी ‘बिग बॉस १७’ मध्ये सलमानला म्हणाला होता की, त्याला पार्ट्यांमध्ये जाण्यासाठी पैसे मिळत नाहीत. मात्र पार्टीत काढलेल्या फोटोंमधून तो २५ ते ३०  लाख रुपये कमावतो.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

कहानी- जड़ें (Short Story- Jade)

"मैंने बंटी की ओर से आंखें बंद नहीं की हैं, सख़्ती और अनुशासन में ढील…

September 15, 2024

पापाराझींना पाहताच का चिडतात जया बच्चन, खरं कारण आलं समोर (Why Does Jaya Bachchan Gets Angry When She Sees Camera)

हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि शतकातील मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन यांचा स्वतःचा…

September 15, 2024

ही शाळेत जाते की नाही! आराध्याला पुन्हा एकदा ऐश्वर्यासोबत एअरपोर्टवर पाहून युजर्सचा प्रश्न ( Aradhya Bachchan Spotted Airport With Mother Aishwarya Rai)

बॉलीवूडच्या सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन गेल्या अनेक महिन्यांपासून वेगळेपणा आणि कौटुंबिक…

September 15, 2024

कार चालकच चाहता निघाला आणि सुव्रतकडे व्यक्त केली भन्नाट इच्छा, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत ( Suvrat Joshi Share Post About His Fan)

काल वरवरचे वधू वर या आमच्या नाटकाचा श्री शिवाजी मंदिर येथे प्रयोग होता. गणेशोत्सवामुळे दादर…

September 15, 2024
© Merisaheli