Marathi

स्तनाचा कर्करोग पुन्हा होणार नाही, याची खात्री करून घेण्यासाठी डॉक्टरांना विचारा हे ६ प्रश्न (What To do if Breast Cancer affects again : Ask these 6 questions to doctors)

स्तनाचा कर्करोग (बीसी) हा जागतिक स्तरावर महिलांमधील सर्वात सामान्य घातक आजार आहे. खरेतर, अल्पावधीत किंवा दीर्घकाळापर्यंत हा आजार पुन्हा होऊ शकतो, जेथे ५० टक्क्यांहून अधिक रूग्णांमध्ये निदानानंतर हा आजार पुन्हा होण्याचा दर ५ वर्षांचा आहे. ही आकडेवारी चिंताजनक असली तरी आजार पुन्हा होणे म्हणजे सर्वकाही संपले असा अर्थ होत नाही, हे माहीत असणे महत्त्वाचे आहे.

या आव्हानात्मक काळादरम्यान निदान, उपचार पर्याय व पुढील व्यवस्थापन समजण्यासाठी डॉक्टरांसोबत खुल्या मनाने व माहितीपूर्ण संवाद साधत स्वत:ला सक्षम करणे महत्त्वाचे आहे.

मुंबईतील टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या अॅडवानस्ड सेंटर फॉर ट्रिटमेन्ट, रिसर्च अॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर (एसीटीआईसी)चे संचालक डॉ. सुदीप गुप्ता म्हणाले, ‘‘विशेषत: शहरी भारतामध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या प्रमाणात स्थिरगतीने वाढ होत आहे. रूग्णांना उपलब्ध उपचारांबाबत माहीत असणे, डॉक्टरांसोबत उपचार पर्यायांमध्ये खुल्या मनाने व सखोलपणे चर्चा करणे महत्त्वाचे आहे. माझा विश्वास आहे की, आधुनिक पोस्ट-ऑपरेटिव्ह क्युरेटिव्ह (सहाय्यक) उपचार रूग्णांच्या निष्पत्तींमध्ये सुधारणा करू शकतात, तसेच जवळपास १० ते २० टक्के रूग्णांमध्ये पुन्हा आजार होण्याचा धोका कमी करू शकतात.’’ 

डॉक्टरांसोबत संवाद साधण्यास तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील असे ६ प्रश्न पुढीलप्रमाणे –

१.    स्तनाच्या कर्करोगाचा टप्पा कोणता आहे आणि त्याचा अर्थ काय? स्तनाच्या कर्करोगाचा टप्पा माहीत असणे योग्य उपचारयोजना आखण्यासाठी महत्त्वाचे आहे. डॉक्टरांना कर्करोगाचा टप्पा, कर्करोगाच्या गाठीचा आकार, जवळचे लिम्फ नोड्स किंवा शरीराच्या इतर भागांवर पसरेल का आणि त्याच्या संभाव्य परिणामांबाबत स्पष्टपणे विचारा.

२.    उपलब्ध उपचार पर्याय कोणते? तुमच्या विशिष्ट स्तनाचा कर्करोगासाठी उपलब्ध उपचार पर्यायांबाबत चौकशी करा. डॉक्टरांना प्रत्येक उपचार पर्यायाचे फायदे, जोखीम व संभाव्य दुष्परिणाम विचारा. तसेच केमोथेरपीपलीकडील नुकत्याच प्रगत उपचारांबाबत विचारा.

३.    आजार पुन्हा होण्याचा धोका काय आहे आणि पुन्हा झालेल्या आजाराचा प्रकार कोणता? सर्जरीनंतर किंवा आजार पुन्हा झाल्यानंतर स्तनाचा कर्करोगाचा कोणता टप्पा आहे या आधारावर आजार पुन्हा होण्याचा धोका समजून घेणे महत्त्वाचे आहे. पुन्हा झालेला आजार हाडे, यकृत किंवा फुफ्फुसे यासारख्या शरीराच्या इतर भागांपासून लोकल किंवा डिस्टण्ट मेटास्टॅसिस असू शकतो. स्तनाचा कर्करोगाचा प्रकार व टप्प्यानुसार धोक्यामध्ये बदल होऊ शकतो. ही माहिती माहित असल्यास पुढील निर्णय घेण्यास मदत होईल.

४.    शिफारस केलेला उपचार जीवनाचा दर्जा कायम राखेल / सुधारेल का? जीवनाच्या दर्जावर उपचाराच्या संभाव्य परिणामांबाबत चर्चा करणे महत्त्वाचे आहे. शिफारस केलेल्या उपचाराचा तुमच्या दैनंदिन क्रियाकलाप, शारीरिक स्वास्थ्य, भावनिक आरोग्य व जीवनाच्या दर्जावर काय परिणाम होईल, याबाबत डॉक्टरांना विचारा. उपचारादरम्यान तुमचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी उपचाराशी संबंधित दुष्परिणाम व मार्गांच्या व्यवस्थापनाकरिता धोरणांबाबत चौकशी करा. 

५.    सहाय्यक केअर सेवा उपलब्ध आहेत का? स्तनाचा कर्करोगाचा सामना करणे शारीरिकदृष्ट्या व भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकते. हेल्थकेअर केंद्राद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या सहाय्यक केअर सेवांबाबत चौकशी करा. यामध्ये बहुआयामी टीमच्या उपलब्धतेचा समावेश असू शकतो, जसे ऑन्कोलॉजी नर्सेस, सामाजिक कार्यकर्ते, सायकोलॉजिस्टस, न्यूट्रिशनिस्ट्‌स व पॅलिएटिव्ह केअर स्पेशालिस्ट्‌स. सहाय्यक केअर सेवा तुमचा व्यवस्थापन प्रवास कार्यक्षमपणे नेव्हिगेट करण्यास मदत करण्यासाठी मार्गदर्शन, भावनिक पाठिंबा, लक्षणांवर व्यवस्थापन व संसाधने प्रदान करू शकतात.

६.    दीर्घकालीन परिणाम व वाचण्याची स्थिती काय आहे? डॉक्टरांसोबत स्तनाचा कर्करोगाचे दीर्घकालीन परिणाम व वाचण्याच्या स्थितीबाबत चर्चा करा. भविष्यात पुन्हा आजार होण्याची शक्यता, देखरेख व फॉलो-अपची गरज आणि आरोग्य उत्तम राखण्यासाठी धोरणे याबाबत विचारा. व्यायाम, आहार व तणाव व्यवस्थापन अशा जीवनशैली बदलांबाबत चौकशी करा, ज्यामुळे दीर्घकाळापर्यंत स्वास्थ्य उत्तम राहण्यास मदत होऊ शकते.  

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

इरफान खानच्या लेकाचा दिलदारपणा, गरजू व्यक्तीला ५० हजारांची मदत, पण आपलं नाव न सांगण्याची अट (Irrfan Son Babil Khan Donated 50 Thousand Rupees To Person )

दिवंगत अभिनेता इरफानचा मुलगा बाबिल खान हा एक चांगला मनाचा माणूस आहे. मुंबईपासून १०० किमी…

April 30, 2024

कविता- चुनौतियां (Poetry- Chunautiyan)

 आवश्यक है कि हम अपने लिए खड़ी करते रहें नियमित कुछ चुनौतियां स्वयं को  मशीन…

April 29, 2024

‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचा मान संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ला (Sanju Rathod Trending Marathi Song Gulabi Sadi Featured On New York Times Square)

गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने संजूच्या करिअरची सुरुवात झाली. ‘बाप्पावाला गाणं’ हे त्याचं पहिलं गाणं सोशल मीडियावर…

April 29, 2024

पंजाबमध्ये गेल्यावर आमिर खानला समजली नमस्तेची ताकद, म्हणाला मी मुस्लिम असल्यामुळे मला… (  Aamir Khan recalls learning the power of folded hands, Says – Understood power of Namaste while shooting in Punjab)

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या अभिनयाने तसेच वागण्याने लोकांची मने जिंकतो. तो आपल्या भावना अत्यंत…

April 29, 2024

पति की राशि से जानिए उनका स्वभाव, इन राशिवाले होते हैं बेस्ट पति (Zodiac Signs That Make Best Husbands, Men With These Signs Proves Loving Partner)

आखिर आपकी जिंदगी का सबसे खास शख़्स यानि आपका जीवनसाथी कैसा होगा, यह एक ऐसा…

April 29, 2024
© Merisaheli