बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुराना सध्या त्याच्या ‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आयुष्मान खुराना हा एक बॉलिवूड अभिनेता आहे ज्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याचा पहिला चित्रपटही प्रेक्षकांना खूप आवडला होता. या अभिनेत्याने 2012 मध्ये ‘विकी डोनर’ या चित्रपटाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली, जो हिट ठरला. या चित्रपटानंतर त्यांने एकामागून एक अनेक हिट चित्रपट दिले.
आपल्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत 5 हून अधिक हिट चित्रपट देणाऱ्या आयुष्मान खुरानाने स्वतः एका मुलाखतीत ही गोष्ट उघड केली आहे. अभिनेत्याने सांगितले होते की, पहिला चित्रपट हिट झाल्यानंतर तो हवेत उडू लागला होता, पण नंतर त्याच्या त्याला जमिनीवरही आणले.
आयुष्मानच्या चित्रपटांची संकल्पना भक्कम तर आहेच शिवाय त्यात भरपूर मनोरंजनही आहे आणि हेच त्याच्या यशाचे रहस्य आहे यात शंका नाही. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या यशाशी संबंधित अनेक किस्से शेअर केले.
मुलाखतीत आयुष्मानने सांगितले की, पहिला चित्रपट ‘विकी डोनर’ हिट झाल्यानंतर तो खूप अहंकारी झाला होता. यशामुळे तो हवेत उडू लागला. त्याने सांगितले की त्याचे वागणे पाहून कुटुंबातील सदस्य अस्वस्थ झाले, परंतु नंतर त्यांनी त्याला योग्य मार्गावर आणले.
अभिनेत्याने सांगितले की तो एका छोट्या शहरातून मुंबईत आला, जिथे त्याने खूप काही साध्य केले ज्याची त्याने कल्पनाही केली नव्हती. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, जेव्हा एका छोट्या शहरातील मुलाला एवढी प्रसिद्धी मिळते तेव्हा त्याला मानसिक त्रास होणे ही काही मोठी गोष्ट नाही. यासोबतच तो म्हणाला की, पहिला चित्रपट हिट झाल्यानंतर एकही चांगली कथा त्याच्याकडे येत नव्हती आणि यशामुळे तो खूप अहंकारी झाला होता.
माझ्या घरच्यांना ही गोष्ट पटकन समजलीते सतत मला टोकत राहिले आणि मला जमिनीवरच ठेवण्याचा अतोनात प्रतय्न केला. अभिनेता पुढे म्हणाला की, पहिला चित्रपट हिट झाल्यानंतर मला कोणते काम द्यायचे हे लोकांना समजत नव्हते, त्यामुळे ‘विकी डोनर’ नंतर ‘दम लगा के हैशा’ पर्यंतचा तीन वर्षांचा प्रवास खूप आव्हानात्मक होता. अभिनेत्याचा असा विश्वास आहे की त्याच्या अहंकारावर मात करण्यात त्याच्या कुटुंबाची मोठी भूमिका आहे. (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम)
सांत्वना सिसक पड़ी. एक पल को चुप रह कर अविनाश ने कहा, "सांत्वना, आज से…
फिल्म 'मिसेज' (Movie Mrs) में सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra)के ससुर बने एक्टर कंवलजीत सिंह (Kanwaljit…
‘कांटा लगा’ गर्ल शेफाली जरीवाला (Kaanta Laga Girl Shefali Jariwala) अब इस दुनिया में (Shefali…
बोनी कपूर (Boney Kapoor) की बेटी और अर्जुन कपूर (Arjun Kapoor) की बहन अंशुला कपूर…
कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में दयाबेन का मुख्य किरदार निभाने वाली दिशा…
रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…