Marathi

शाहरुखने भर कार्यक्रमात केेलेले प्रियांकाला प्रपोज, अशी होती अभिनेत्रीची रिअॅक्शन (When Shahrukh Khan Proposed Priyanka Chopra in a Crowded Gathering, Desigirl Reacted Like this)

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने इंडस्ट्रीतील सर्वच अभिनेत्रींसोबत काम केले आहे. टॉपच्या अभिनेत्री त्याच्यासोबत काम करण्यास नेहमीच उत्सुक असतात. काजोल, माधुरी दीक्षित, राणी मुखर्जी, जुही चावला, कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण यांसारख्या अभिनेत्रींसोबत किंग खानची ऑन-स्क्रीन जोडी चांगलीच जमली, पण जेव्हा किंग खानने देसिगर्ल प्रियांका चोप्रासोबत काम केले तेव्हा दोघांची केमिस्ट्री चांगलीच गाजली होती, त्यासोबतच त्यांच्या अफेअरच्या बातम्याही खूप चर्चेत होत्या. दरम्यान, एका कार्यक्रमात किंग खानने प्रियांका चोप्राला प्रपोज केले तेव्हा अभिनेत्रीने कशी प्रतिक्रिया दिली ते जाणून घेऊया.

शाहरुख खान आणि प्रियांका चोप्राची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री तसेच त्यांच्या अफेअरची खूप चर्चा झाली होती, ज्यामुळे शाहरुख आणि गौरीच्या घरात वाद निर्माण झाले होते.

‘डॉन’ चित्रपटापासून ते ‘बिल्लू बार्बर’पर्यंत काम करत असताना, शाहरुख खान आणि प्रियांका चोप्राच्या अफेअरच्या बातम्या मीडियामध्ये वेगाने पसरू लागल्या होत्या. असे म्हटले जाते की, एकदा किंग खानने प्रियांकाला लग्नासाठी प्रपोज केले होते. ही गोष्ट 2000 ची आहे, जेव्हा शाहरुख ‘मिस इंडिया पेजेंट’ च्या ज्युरीचा भाग बनला होता, तेव्हा 17 वर्षांची प्रियांका चोप्रा दहा फायनलिस्टपैकी एक होती.

शाहरुख खानने ज्युरी सदस्य या नात्याने प्रियांका चोप्राला विचारले की तिला जगप्रसिद्ध क्रिकेटपटू, सर्जनशील उद्योगपती किंवा त्याच्यासारख्या सामान्य अभिनेत्याशी लग्न करायचे आहे का. या प्रश्नाच्या उत्तरात प्रियांकाने या सर्व पर्यायांमधून भारतीय खेळाडू निवडणार असल्याचे सांगितले होते.

याशिवाय किंग खान आणि देसिगर्लचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये शाहरुख खानने नॅशनल टीव्हीवर प्रियांकाला प्रपोज केले होते. एका इव्हेंटमध्ये बादशाह खानने ‘मॅरी मी मॅरी मी’ असं इंग्रजीत एक गाणं गायलं, ज्यावर प्रियंका आधी त्याच्याकडे आश्चर्याने पाहते आणि मग हसायला लागते.

रिपोर्ट्सनुसार, ‘डॉन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुख आणि प्रियांका यांच्यात जवळीक वाढू लागली होती. नाईट क्लब, पार्टी आणि इव्हेंटमध्ये ते एकत्र हँग आउट करताना दिसले. एका मुलाखतीत प्रियांकासोबतच्या अफेअरच्या बातमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना शाहरुखने अशा अफवा आपल्यासाठी त्रासदायक असल्याचं म्हटलं होतं.

शाहरुख खान म्हणाला होता की, त्याच्यासोबत काम करणाऱ्या महिलेची विचारपूस करण्यात आली आणि त्यांचा आदर केला गेला नाही. तो म्हणाला होता की प्रियांका त्याची सर्वात चांगली मैत्रीण आहे, ती त्याच्या हृदयाच्या खूप जवळ आहे आणि कायम राहील.

विशेष म्हणजे शाहरुख आणि प्रियांकाच्या अफेअरमुळे किंग खानच्या वैवाहिक आयुष्यात भूकंप आला होता. शाहरुख आणि गौरीचे लग्न त्यांच्या अफेअरच्या अफवांमुळे तुटण्याच्या मार्गावर होते, मात्र त्यांचे लग्न वाचवण्यात करण जोहरने महत्त्वाची भूमिका बजावली.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

क्यों हैं महिलाएं आज भी असुरक्षित? कौन है ज़िम्मेदार? (Why Are Women Still Unsafe? Who Is Responsible?)

कहीं 3-4 साल की मासूम बच्चियां, तो कहीं डॉक्टर और नर्स, कहीं कॉलेज की छात्रा,…

September 18, 2024

कहानी- हाईटेक तलाक़ (Short Story- Hightech Talaq)

आनंद सिर्फ़ उसे नज़रअंदाज़ करता आया था, कभी तलाक़ की बात करता भी नहीं था.…

September 18, 2024

मोडलं अब्दू रोझिकचं लग्न, स्वत:च दिली माहिती, हे आहे कारण (Bigg Boss 16 Fame Abdu Rozik Calls Off Wedding With Fiance)

बिग बॉस 16 सह घराघरात नाव कमावणारा स्पर्धक अब्दू रोजिकबद्दल एक दुःखद बातमी ऐकायला मिळत…

September 18, 2024

पितृ पक्ष २०२४ (Pitru Paksha 2024)

अनंत चतुर्दशी झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितृ पंधरवडा असतो. प्रतिपदा ते अमावस्या हा काळ…

September 18, 2024
© Merisaheli