Marathi

कंगना लढवणार लोकसभा निवडणूक? ‘आप’ कडूनही परिणीतीच्या नावाचा विचार सुरु (Will Kangana contest the Lok Sabha elections? ‘Aap’ is also thinking of Parineeti’s name)

बॉलिवूड क्वीन कंगना रणौत निवडणूकीत उतरणार असल्याची चर्चा सध्या सतत रंगत आहे. पण यावर आता अभिनेत्रीने मौन सोडले असून तिचे मत व्यक्त केले आहे.

चंदीगढमध्ये अभिनेत्री किरण खेर खासदार म्हणून काम पाहत आहेत. पण त्या सर्वसामान्यांच्या समस्या जाणण्यासाठी कधीच मैदानात उतरल्या नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता त्यामुळे किरण खेर यांच्या जागी नवीन चेहरा उतरवण्याचा विचार भाजप करत असल्याचे बोलले जाते. शिवाय  कंगना भाजपच्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन करत असते. त्यामुळे भाजपाकडून कंगनाला चंदीगढ मध्ये उमेरदवारी मिळू शकते असे काहींचे म्हणणे आहे.

अभिनेत्रीने यावर प्रतिक्रिया देत हे वृत्त फेटाळून लावले आहे. कंगनाने इन्स्टा स्टोरीवर लिहिले आहे की, ‘मी हेडलाइन दिली आहे असे समजून माझे नातेवाईक आणि मित्र मला ती पाठवत आहेत, पण ही हेडलाइन आणि बातमी माझ्याकडून देण्यात आलेली नाही.’

आम आदमी पार्टीही पुढच्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे नेते आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिला आपला नवा उमेदवार बनवू शकते अशी चर्चा रंगली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कहानी- अपाहिज़ (Short Story- Apahij)

"प्यार वाली बात कहां से आ गई.. आपको भी तो जीजू…""नहीं रे," दीदी ने मेरा…

April 24, 2024

छावा सिनेमातील विकी कौशलचा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील लूक व्हायरल (Vicky Kaushal Look From Chava Movie Chatrapati Sambhaji Maharaj Goes Viral)

ॲक्शन, देशभक्ती आणि कॉमेडी भूमिकांमध्ये आपले कौशल्य सिद्ध करणाऱ्या विकी कौशलचे सोशल मीडियावर चांगले फॅन…

April 24, 2024

महाराष्ट्राची हास्यजत्रानंतर गौरव मोरे गाजवतोय हिंदी शो, जुही चावलासोबत धमाल जुगलबंदी चर्चेत ( Gaurav More Share Cute Bond With Juhi Chavla On The Set Of Madness Machayege )

महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे ! कॉमेडीची अचूक संधी साधत…

April 24, 2024

फिटनेसचे 15 फायदे (15 Benefits Of Fitness)

नियमित व्यायाम करण्याचे काय फायदे होतात, ते जाणून घ्या आणि निरोगी राहा… आपलं शरीर फिट…

April 24, 2024

मनीषा कोईरालाने माधुरीला घाबरून एक चांगला सिनेमा नाकारला; आज होतोय पश्चाताप (Manisha Koirala Rejected Dil Toh Pagal Hai Due To ‘Insecurity’: ‘Was Pitted Against Madhuri Dixit, Got Scared’)

'हिरामंडी द डायमंड बझार' या सिनेमातून अभिनेत्री मनीषा कोईरालाने बऱ्याच काळाने सिनेविश्वात कमबॅक केलंय. संजय…

April 24, 2024
© Merisaheli